Fake Call Centre: दोनापावला येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; 14 जणांना अटक

सायबर शाखेची कारवाई
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Fake Call Centre Busted At Dona Paula: काही दिवसांपूर्वी म्हापसा व पर्वरीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात गोवा पोलिसांना यश आले होते. दरम्यान अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोनापावला येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यास सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे.

या कारवाईत 14 संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून 5.5 लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Arrested
Dabolim Airport: बनावट पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न; महिलेसह एका युवकाला घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, दोनापावला येथे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर कार्यरत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे दोनापावला येथे छापा टाकण्यात आला.

ही टोळी गेल्या काही महिन्यांपासून हे सेंटर चालवत होती. या कारवाईत एकूण 14 परप्रांतिय संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5.5 लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

संशयितांना न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com