Cutbona Jetty: 'कुटबण' घेणार मोकळा श्वास! कॉलराची साथ जवळपास संपल्‍यात जमा; जेटी पूर्णपणे स्‍वच्‍छ करणार

Cutbona Mobor: कुटबण जेटीची अवस्‍था काय आहे हे जाणून घेण्‍यासाठी सिक्‍वेरा यांनी आज या जेटीला भेट दिली. त्‍यांच्‍याबराेबर दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी उदय प्रभुदेसाई आणि अन्‍य अधिकारी उपस्‍थित होते.

Aleixo Sequeira | Cutbona JettyDainik Gomantak
Published on
Updated on

Aleixo Sequeira About Cutbona Mobor Jetty Cholera Cases

मडगाव: कुटबण जेटीवर प्रशासनाने आवश्‍‍यक असलेले उपाय त्‍वरित सुरू केल्‍याने या जेटीवर जी कॉलराची साथ पसरली होती ती जवळपास आटोक्‍यात आली आहे. या जेटीवर पार्क करून ठेवलेल्‍या डिंगी बोटी पूर्णत: हटविण्‍यात आल्‍या आहेत. त्‍याशिवाय पार्क करून ठेवलेल्‍या ४६ बोटीही हटविल्‍या आहेत. ही जेटी ३ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्णपणे स्‍वच्‍छ केली जाईल, असे पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी सांगितले.

कुटबण जेटीची अवस्‍था काय आहे हे जाणून घेण्‍यासाठी सिक्‍वेरा यांनी आज या जेटीला भेट दिली. त्‍यांच्‍याबराेबर दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी उदय प्रभुदेसाई आणि अन्‍य अधिकारी उपस्‍थित होते. पूर्वीच्‍या तुलनेत आता ही जेटी साफ करण्‍यात आली आहे. या जेटीवर अजूनही काही प्रमाणात पिंजलेली जाळी पडून आहेत ती सर्व जाळी ३ ऑक्‍टोबरपर्यंत हटविण्‍यात येतील, असे त्‍यांनी सांगितले.

Cutbona Mobor: कुटबण जेटीची अवस्‍था काय आहे हे जाणून घेण्‍यासाठी सिक्‍वेरा यांनी आज या जेटीला भेट दिली. त्‍यांच्‍याबराेबर दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी उदय प्रभुदेसाई आणि अन्‍य अधिकारी उपस्‍थित होते.
Cutbona Mobor: 'मोबोर'मध्ये संख्या वाढली! कॉलरा रुग्‍णांची एकूण संख्‍या '२१८' वर

सरकार आवश्‍यक उपाय करेल!

स्‍थानिक मच्‍छीमारांनी सहकार्य केल्‍यामुळेच हे काम वेगाने होऊ शकले, त्‍यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. मच्‍छीमारांच्‍या सुरक्षेसाठी जे काय आवश्‍यक उपाय करायचे आहेत, तेही सरकार करणार आहे.

बाहेरच्‍या राज्‍यातून आलेले मच्‍छीमार गोव्‍याच्‍या हद्दीत येऊन मच्‍छीमारी करतात ही गोष्‍ट खरी असून मच्‍छीमारांनी सरकारच्‍या नजरेस ही बाब आणून दिली आहे. सरकार त्‍यावर आवश्‍‍यक ते उपाय घेईल, असे सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com