Cutbona Mobor: 'मोबोर'मध्ये संख्या वाढली! कॉलरा रुग्‍णांची एकूण संख्‍या '२१८' वर

Cutbona Jetty: कॉलराच्‍या उद्रेकामुळे संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधलेल्‍या मोबोर आणि कुटबण जेटीवरील कॉलराची साथ अजून नियंत्रणात आलेली नाही
Cutbona Jetty: कॉलराच्‍या उद्रेकामुळे संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधलेल्‍या मोबोर आणि कुटबण जेटीवरील कॉलराची साथ अजून नियंत्रणात आलेली नाही
Cutbona Mobor CholeraCanva
Published on
Updated on

Cutbona Mobor Cholera Cases

मडगाव: कॉलराच्‍या उद्रेकामुळे संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधलेल्‍या मोबोर आणि कुटबण जेटीवरील कॉलराची साथ अजून नियंत्रणात आलेली नाही. सोमवारी आणखी १३ रुग्‍ण सापडल्‍याने आतापर्यंत या भागात सापडलेल्‍या एकूण रुग्‍णांची संख्‍या २१८ वर पोचली आहे. सध्‍या मोबोर भागात जास्‍त रुग्‍ण सापडू लागले आहेत अशी माहिती आरोग्‍य खात्‍याकडून मिळाली आहे.

दरम्‍यान, मोबोर येथे बोटीवर काम करणाऱ्या एका कामगाराचा मागच्‍या आठवड्यात मृत्‍यू झाला होता. मात्र हा मृत्‍यू कॉलरामुळे की अन्‍य काही कारणांमुळे हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या मृताची उत्तरीय तपासणी अजून करण्‍यात आलेली नाही.

त्‍याचे नातेवाईक अजून गोव्‍यात पोचलेले नाहीत. ते गोव्‍यात आल्‍यावरच उत्तरीय तपासणी केली जाईल, अशी माहिती हॉस्‍पिसियोच्‍या सूत्रांकडून मिळाली. ही उत्तरीय तपासणी झाल्‍यानंतरच हा मृत्‍यू कॉलरामुळे की काही अन्‍य कारणांमुळे ते स्‍पष्‍ट होणार आहे.

आठवड्याभरात साथ आटोक्यात; डॉ. बेतोडकर

साथ निवारण विभागाचे प्रमुख डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, हे नवीन रुग्‍ण यापूर्वी कॉलराचा प्रादुर्भाव न झालेल्‍या बोटीवर काम करणारे कामगार असून यापूर्वी सात जणांना मडगावातील दोन खासगी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे. मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात सध्‍या चार जणांवर उपचार चालू असून तिघांवर बाळ्‍ळीच्‍या आरोग्‍य केंद्रात उपचार चालू आहेत. याशिवाय सात जणांवर घरातच उपचार चालू आहेत. एका आठवड्यात या भागातील कॉलेरा रुग्‍णांची संख्‍या कमी होण्‍याची अपेक्षा आहे. कदाचित त्‍यात अकस्‍मात वाढ होऊन नंतर हे प्रमाण हळू हळू खाली उतरू शकते. असे जरी असले तरी रुग्‍णांची संख्‍या शून्यावर येईपर्यंत ही साथ आटोक्यात आली असे आम्‍ही म्‍हणू शकणार नाही, असे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com