Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

Fisheries Department Goa : गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टीन्स यांच्या विनंतीवरून बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कुटबण जेटीची पाहणी करण्यात आली.
Goa Cutbona Jetty
Goa Cutbona JettyDainiak Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टीन्स यांच्या विनंतीवरून बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कुटबण जेटीची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक त्रुटी उघड झाल्याची माहिती मार्टीन्स यांनी पत्रकारांना दिली. यावेळी मत्स्यउद्योग खात्याचे अधिकारी, आरोग्य खात्यातील डॉक्टर, वेळ्ळी सिव्हिक फोरम तसेच बोट मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जेटीवरील स्वच्छतागृह मत्स्यउद्योग खात्याला योग्य प्रकारे सांभाळणे शक्य नसेल, तर या कामांसाठी इतर एजन्सीची नियुक्ती करावी, अशी मागणी मार्टीन्स यांनी केली. त्यांनी सांगितले की, शौचालयात पाणीपुरवठ्याचा अभाव आहे. तेथील कामगारांना शौचालयात जाता येत नाही, असे त्यांनी नमूद केले. जेटीवर स्वच्छता असणे गरजेचे आहे; मात्र याच जेटीवर काही जणांनी तंबू उभारले असून, तेथे वेल्डिंगचे काम केले जाते, असे निदर्शनास आले.

Goa Cutbona Jetty
Mango Farming: एकाच बागेत घेतात 26 जातींच्या आंब्यांचे उत्पादन, पाली-सत्तरीतील आंब्यांना राज्याबाहेरही मागणी; बाग पाहण्यासाठी होतेय गर्दी

जेटीच्या देखभालीसाठी योजना हवी : मार्टीन्स

  • जेटीवर कॅन्टीन सुविधा नाही; तसेच बेकायदेशीर पद्धतीने काही दुकाने सुरू आहेत. जेटीच्या देखभालीसंदर्भात एक ठोस योजना तयार करणे आवश्यक असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले.

  • मत्स्यउद्योग खात्याने तातडीने या जेटीची पाहणी करून नवीन मोसम सुरू होण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर कराव्यात; अन्यथा रोगराई पसरण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com