Gudhi Padwa 2023 : रुढी, परंपरेत अडकू नका; हिंदू संस्कृतीचा उद्धार करा!

दिग्दर्शक ओम राऊत : ‘भारताचे पुनर्जागरण’वर मार्गदर्शन; म्हापशात सार्वजनिक गुढीपूजन
Film director om raut
Film director om rautDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या देशाकडे प्रचंड मोठी तरुणांची शक्ती आहे. याच मंडळींकडून हिंदू तसेच भारतीय संस्कृती नव्या दमाने आणि विचारांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होतोय. म्हापशातील गुढीपाडवा उत्सव याच ‘भारताचे पुनर्जागरण’चे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

मुळात आपण रुढी व परंपरेत फारसं अडकू नये. परंतु आपल्या संस्कृतीचा विकास अवश्य करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले.

म्हापशात टॅक्सी स्टॅण्डवर नववर्ष स्वागत समितीतर्फे सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

यावेळी ‘भारताचे पुनर्जागरण’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. समितीचे अध्यक्ष अमेय नाटेकर, कार्यवाहक विनय वालावलकर, उपाध्यक्ष प्राची साळगावकर, सायली परब, खजिनदार श्रेयश कवळेकर व पदाधिकारी हजर होते.

Film director om raut
Canacona : काणकोणात ‘नेत्रावती’, ‘गांधीधाम’ला थांबा

शोभायात्रा आणि ‘गोमंतगाज’ कार्यक्रम

मुख्य सोहळ्यापूर्वी पहाटे ५ वाजता खोर्ली, म्हापसा तसेच आजूबाजूच्या भागातून पारंपरिक वेशात व ढोलताशाच्या गजरात तसेच महिलांनी हातात पंचारती घेऊन शोभयात्रेत सहभाग घेतला. ही शोभायात्रा महारूद्र संस्थानकडून ज्यो मिनेझिस फार्मसी, पानकार दुकानाला वळसा घालून टॅक्सी स्थानकावरील कार्यक्रमस्थळी आली व तेथे तिची सांगता झाली.

शोभायात्रेत उपसभापती जोशुआ डिसोझा, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे या मान्यवरांनीही सहभाग घेतला.

सायंकाळी कला व संस्कृती खाते पुरस्कृत तसेच विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्था प्रस्तुत ‘गोमंतगाज’ हा गोमंतभूमीतील लोककलांचा कार्यक्रम झाला. यात समईनृत्य, सुवारीवादन, जागर, घोडमोडणी, गोफ, धनगर, शिगमोत्‍सव सादरीकरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com