Canacona : काणकोणात ‘नेत्रावती’, ‘गांधीधाम’ला थांबा

रेल्वे मंत्रालयाची मान्यता : एप्रिल महिन्यापासून कार्यवाही होणार
Canacona Railway
Canacona Railway Dainik Gomanak

काणकोण रेल्वे स्थानकावर नेत्रावती व गांधीधाम एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या थांबवण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.नेत्रावती एक्स्प्रेस रेल्वे दोन एप्रिल व गांधीधाम एक्स्प्रेस 8 एप्रिलपासून काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

या संदर्भात रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांनी आदेश काढला आहे. मात्र या रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकीटांच्या खपावर लक्ष ठेवून पाच महिन्यानंतर अहवाल बोर्डाला कळविण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Canacona Railway
Karanataka Election: ऑन ड्यूटी 24 तास! गोवा, महाराष्ट्रातून येणाऱ्या अवैध मद्य, पैसा यावर कर्नाटकचे लक्ष

काणकोणमधील ज्येष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी रेल्वे थांबण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदने दिली होती, त्याचप्रमाणे आंदोलने छेडली होती. गेल्या महिन्यात सभापती रमेश तवडकर तसेच नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व शंभा नाईक देसाई यांनी दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्री आश्वीनीकुमार यांची भेट घेतली होती.

त्यावेळी रेल्वे मंत्र्यानी सभापतींना रेल्वे काणकोण रेल्वे स्थानकावर थांबवण्याचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता आता करण्यात आली आहे. देशी व परदेशी पर्यटकाबरोबरच स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, या स्थानकावर थांबणे गरजेचे होते.

आरक्षण सुविधा हवी

या रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षणाची सोय नाही. रेल्वे बोर्डाने ती जबाबदारी पोस्ट ऑफीसकडे दिली आहे, त्यासाठी पूर्ववत रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षणाची सोय करावी. रेल्वे स्थानकावर आरक्षणाची सोय झाल्यास प्रवाशांना सोयीचे होणार आहे, असे येथील नागरिकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com