Goa News: बाबूश-जेनिफर यांना अखेर दिलासा

Goa News: या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जानेवारी रोजी ठेवण्‍यात आली आहे.
Babush Monserrat Rape Case
Babush Monserrat Rape CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणात महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या पत्‍नी आमदार जेनिफर मोन्‍सेरात या दोघांनाही दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांनी तात्‍पुरता दिलासा देताना बाबूशना तीन, तर जेनिफरना दोन महिने या प्रकरणाच्‍या सुनावणीस गैरहजर राहण्‍याची मुभा दिली आहे.

Babush Monserrat Rape Case
Dhaloustav In Goa: गोव्यातील महिलांच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ: धालोत्सव

2008 साली झालेल्‍या या प्रकरणाची सुनावणी राजकारण्‍यांचे खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍या न्यायालयात सुरू असून या प्रकरणाच्‍या सुनावणीस आपल्‍याला कायमस्‍वरूपी गैरहजर राहण्‍याची परवानगी द्यावी, अशी मागणी मोन्‍सेरात दाम्‍पत्‍याने केली होती.

ही मागणी अंशत: मान्‍य करताना हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जानेवारी रोजी ठेवण्‍यात आली आहे. या प्रक़रणात बाबूश आणि जेनिफर यांच्‍या व्‍यतिरिक्‍त आणखी ३५ संशयितांवर सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Opposition Alliance
Goa State Cooperative Bank Loan Fraud
Dr Vrushabh Doshi POCSO Case
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com