Curchorem: कुडचडे सेक्स स्कँडलचा तपास आता 'क्राईम ब्रांच'कडे, नवे धागेदोरे हाती लागणार

Curchorem Sex Scandal Case: कुडचडे परिसरात उघडकीस आलेल्या धक्कादायक सेक्स स्कँडल प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, या गुन्ह्याचा तपास आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.
Curchorem Sex Scandal Case
Curchorem Sex Scandal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण गोव्यातील कुडचडे परिसरात उघडकीस आलेल्या धक्कादायक सेक्स स्कँडल प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, या गुन्ह्याचा तपास आता क्राईम ब्रांचकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनी (DGP) या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून सोहम नाईक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध आता वरिष्ठ यंत्रणा घेणार आहेत.

कुडचडे येथील या प्रकरणाने संपूर्ण गोव्यात खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी यावर प्राथमिक कारवाई केली होती, मात्र प्रकरणाची संवेदनशीलता आणि त्यात गुंतलेले मोठे मासे पाहता, हा तपास विशेष शाखेकडे देणे आवश्यक असल्याचे मानले जात होते. क्राईम ब्रांच आता या प्रकरणाचा सर्व कोनातून तपास करणार आहे.

Curchorem Sex Scandal Case
Goa Hidden Beach: पांढरी वाळू, नारळाची झाडे; गोव्यातल्या 'या' हिडन बीचचे सौन्दर्य बघा

संशयित सोहम नाईक पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील मुख्य संशयित सोहम नाईक याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने किती जणांना या जाळ्यात ओढले आणि त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत, याचे तांत्रिक पुरावे पोलीस गोळा करत आहेत. त्याच्या मोबाईल फोनमधील डेटा आणि कॉल रेकॉर्ड्सवरून अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Curchorem Sex Scandal Case
Goa Politics: खरी कुजबुज; युरींचा राग की दबाव?

या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. क्राईम ब्रांचकडे तपास गेल्यामुळे आता या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलीस या रॅकेटमधील इतर साथीदारांच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com