Curchorem Sex Scandal: कुडचडे लैंगिक शोषण प्रकरण; सोहमच्या मित्रांचीही आता चौकशी सुरू

Curchorem Sex Scandal Case Update: कुडचडेतील सोहम नाईक याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाने गती घेतली असून सोहमच्या मित्रांचीही क्राईम ब्रँचने चौकशी सुरू केली आहे.
Curchorem Sex Scandal
Curchorem Sex ScandalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कुडचडेतील सोहम नाईक याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाने गती घेतली असून सोहमच्या मित्रांचीही क्राईम ब्रँचने चौकशी सुरू केली आहे. सोहमने ज्या अल्पवयीन मुलींचे नको त्या अवस्थेतील छायाचित्रण केले, त्यात त्याच्या मित्रांचाही हात आहे का याचा शोध घेतला जात आहे.

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी काकोडा-केले येथे राहणाऱ्या सोहमच्या एका मित्राची जबानी नोंद करून घेतली. आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस काकोडा येथे दाखल झाले होते.

Curchorem Sex Scandal
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

सोहमने हे अश्लील चित्रीकरण कुठे केले? त्यात त्याच्यासोबत आणखी कुणी सहभागी होते का, या कोनातून सध्या तपास सुरू आहे. सोहमने या कृत्यासाठी त्याच्या बाणसाय येथील फ्लॅटचा वापर केला होता, अशी चर्चा सध्या सुरू असून पोलिस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत.

Curchorem Sex Scandal
Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

सोहमने काही अल्पवयीन मुलींचे नको असलेल्या अवस्थेत व्हिडिओ काढले होते. हे व्हिडिओ त्याने काही मित्रांना शेअर केले होते. या दृष्टीनेही पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com