Curchorem Road : वडामळ-भांडोळ रस्‍ताही नाही अन्‌ बालरथही नाही! विद्यार्थ्यांची ससेहोलपट

Curchorem Road : जंगल भागातून जाणाऱ्या या खड्डेमय रस्त्यावर गवे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह लोकांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
Curchorem Road
Curchorem RoadDainik Gomantak

Curchorem Road :

कुडचडे, वडामळ-भांडोळ किर्लपाल येथील खड्डेमय रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी गेल्‍या २१ वर्षांपासून प्रलंबित आहे. २००३ साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. येथील सुमारे ५०० मीटरचा रस्ता तर पूर्णपणे खड्डेमय बनला आहे.

त्‍यामुळे बालरथ गावात येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना चालत शाळेत जावे लागते व नंतर भर उन्‍हात परत यावे लागते. जंगल भागातून जाणाऱ्या या खड्डेमय रस्त्यावर गवे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह लोकांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्‍यामुळे सरकारने त्वरित या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Curchorem Road
Goa Politics: 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', विरियातो म्हणतात खोटं बोलणं मोदींचा स्वभाव

वडामळ येथे जाणाऱ्या या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यास एका व्यक्तीने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ५०० मीटर रस्त्याचे हॉटमिक्स काम रखडले होते. सध्या खड्डेमय रस्त्याचा त्रास स्थानिक लोकांना तसेच शिरोडा, मडगाव व वेर्णा भागात जाणाऱ्या कामगारांना होत आहे.

प्रलंबित असलेल्या खड्डेमय रस्त्याचे हॉटमिक्स करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. गेल्‍या दि. १० जानेवारीही स्थानिकांनी मुख्यमंत्री, बांधकाम व अन्य खात्यांना निवेदने देऊन हॉटमिक्स करण्याची मागणी केली होती. पण अजूनपर्यंत ती पूर्ण करण्‍यात आली नसल्‍याने स्थानिक लोक संताप व्यक्त करत आहेत.

निवडणुकीवरील बहिष्‍काराचा निर्णय मागे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी खड्डेमय रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला असला तरी त्यात कोणीच राजकारण करू नये. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.

पण लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बदलला असल्याचे ग्रामस्‍थ सुरेश सावंत देसाई यांनी सांगितले.

Curchorem Road
Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

वडामळ येथील खड्डेमय ५०० मीटर रस्त्याचे हॉटमिक्स करण्याची मागणी गेल्‍या अनेक वर्षांपासून करण्‍यात येत आहे. या खड्डेमय रस्त्याचा त्रास स्थानिक तसेच या भागातून प्रवास करणाऱ्या लोकांना होत आहे. सरकारने यासंबंधी त्वरित निर्णय घेऊन रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करून लोकांना दिलासा द्यावा.

- सुरेश सावंत देसाई, ग्रामस्‍थ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com