Quepem: 'त्‍या' भावाने काढले बहिणींचे विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो! धमकी देऊन करायचा मारहाण; केपे अत्याचार प्रकरणात धक्कादायक गोष्टी उघड

Quepem Physical abuse case: केपे येथे रक्षाबंधनाच्‍या दिवशी भावाने सख्ख्या बहिणीवर केलेल्‍या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता अनेक धक्कादायक गोष्‍टी पुढे येऊ लागल्‍या आहेत.
Quepem Crime
Quepem CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केपे येथे रक्षाबंधनाच्‍या दिवशी भावाने सख्ख्या बहिणीवर केलेल्‍या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता अनेक धक्कादायक गोष्‍टी पुढे येऊ लागल्‍या आहेत. संशयिताने पीडित बहिणींचे विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो आणि व्‍हिडिओही काढले होते. आपल्‍या मागणीला नकार दिल्‍यास ते व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्‍याची धमकी देत असे. तसेच बहिणींना लाकडी दांड्याने मारहाण करायचा, असे तक्रारीत नमूद करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संशयिताला सध्‍या ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

भावाकडून सातत्याने लैंगिक अत्‍याचार होत असल्यामुळेच कंटाळून पीडित बहिणीने घर सोडले होते. मडगावला एका ठिकाणी ती घरकाम करत असे. ८ ऑगस्‍ट रोजी तिच्‍यावर भावाने अत्‍याचार केला. ११ ऑगस्‍ट रोजी समाजसेविका ॲड. प्रतिमा कुतिन्‍हो यांच्‍या मदतीने त्‍या मुलीने केपे पोलिस स्‍थानकावर तक्रार दिली.

Quepem Crime
Goa Crime: मुंगूल गँगवॉर प्रकरण, वॉल्‍टरचे दक्षिणेतील वर्चस्‍व भेदण्‍यासाठी केपे-फोंड्यातील 4 गँग एकवटल्या

त्‍यानंतर कुतिन्‍हो यांनी प्रसारमाध्‍यमांना या घटनेची माहिती देण्‍यासाठी एक व्‍हिडिओ जारी केला. हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर संशयिताच्‍या एका मित्राने तो पाहिला आणि त्‍याने त्‍याची माहिती संशयिताला दिली. आता पोलिस आपल्‍यापर्यंत पोचणार याची खात्री झाल्‍यामुळे त्‍याने घरातून पळ काढून जंगलाचा आसरा घेतला होता.

संशयिताचा शोध घेण्‍यासाठी केपेचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्‍या नेतृत्‍वाखाली आठ पोलिसांचे पथक कामगिरीवर होते. ११ रोजी सायंकाळी ५ वाजता शोधमोहीम सुरू झाली. मात्र संशयित सापडला नाही. देवसा भागातील जंगलाचा भाग रात्रभर पोलिसांनी पिंजून काढला. तरीसुद्धा तो त्‍यांच्‍या हाती लागला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी आडोशाच्‍या लपून बसलेला तो आढळला होता.

Quepem Crime
Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा काही केल्या सुटेना, गृहमंत्री शहांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

आठजणांच्‍या कुटुंबात एकटाच कमावता

संशयिताला आणखी दोन बहिणी आहेत. त्‍यांच्‍यावरही तो लैंगिक अत्‍याचार करायचा. संशयिताचे आठजणांचे कुटुंब असून घरात तो एकटाच कमावतो. त्‍यामुळे त्‍याची ही काळी कृत्‍ये माहीत असूनही मुकाटपणे ते सर्व सहन करत होते. मात्र, शेवटी हा अत्‍याचार सहन न झाल्‍याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले. केपेच्‍या महिला उपनिरीक्षक रिफा बार्रेटो पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com