Curchorem Railway Station: कुडचडे सावर्डे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती.
दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ने 51 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे ठरवले होते. त्यासाठी केंद्राच्या अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीतून निधी दिला जाणार आहे. हे रेल्वेस्थानक 135 वर्षे जुने आहे.
पुनर्विकासाच्या कामामुळे सध्याची स्टेशन इमारत 200 चौरस मीटरने वाढवून नवीन बुकिंग क्षेत्र तसेच वेटिंग हॉलचा समावेश केला जाईल.
प्लॅटफॉर्म निवारा आणि प्लॅटफॉर्म फ्लोअरिंग, आतील सुधारणांसोबतच फर्निचर, टॉयलेट, पार्किंग स्पेस, लँडस्केपिंग, मुख्य स्टेशन इमारतीचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वार पोर्चेस यांचा समावेश पुनर्विकासात केला जाईल.
याशिवाय नवीन 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज, दोन लिफ्ट आणि दोन एस्केलेटरचे बांधकाम केले जाणार आहे. LED फलक, LED चिन्हे आणि दर्शनी प्रकाशयोजना, याशिवाय ट्रेन इंडिकेशन बोर्ड, सार्वजनिक घोषणा यंत्रणा, घड्याळे इत्यादीही केले जाईल.
दरम्यान, पुनर्विकासापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्या येथे पुन्हा थांबवा, अशी मागमी सावर्डे-कुडचडे रेल्वे प्रवासी संघटनेने राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना पत्राद्वारे केली आहे.
याशिवाय वास्को-मिरज-वास्को दैनंदिन ट्रेन, वास्को-सोलापूर मार्गे विजापूर ट्रेन आणि वास्को-चेन्नई साप्ताहिक एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.