Curchorem: 'सेक्स स्कॅण्डल' प्रकरणी पॉक्सो गुन्हा! दबावानंतर पोलिसांची कारवाई; धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता

Curchorem sex scandal case: कुडचडेत गाजत असलेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील सोहम नाईक (वय २३) याच्याविरोधात अखेर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
curchorem sex scandal case
curchorem sex scandal caseDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: कुडचडेत गाजत असलेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील सोहम नाईक (वय २३) याच्याविरोधात अखेर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विरोधकांच्या तीव्र मागणीनंतर कुडचडे पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली.

सोमवारी सकाळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडचडे पोलिस स्थानकात धडक देत, आरोपीविरोधात ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा का नोंदवला नाही, असा जाब विचारला होता. त्यानंतर पोलिसांनी कलम ८, १२, १५(२) पॉक्सो तसेच ८(२) बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला.

या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, आरोपीच्या मोबाईलमध्ये १६ मुलींचे व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. ही संख्या पन्नासहून अधिक असू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी सखोल तपास केल्यास आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. याप्रकरणी पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी; तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी केले आहे.

curchorem sex scandal case
Curchorem: कुडचडेतील 'सेक्‍स स्‍कँडल'ला फुटली वाचा! नगरसेवकाच्या मुलाला अटक; संतप्त लोक जमले पोलीस स्थानकाबाहेर

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न

हे प्रकरण संवेदनशील असताना शिक्षण विभाग, महिला आयोग आणि बाल आयोगाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याबद्दल सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची टीका अमित पाटकर यांनी केली.

curchorem sex scandal case
Curchorem Accident: कुडचडेत कार आणि डंपरचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

सरदेसाई–पाटकरांची कुडचडे पोलिस ठाण्यावर धडक

या प्रकरणात सुरुवातीला ‘पॉक्सो’ कायदा लागू न केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. आमदार विजय सरदेसाई यांनी पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. त्यांनी अमित पाटकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांना जाब विचारला. रविवारी रात्री सुमारे ३०० नागरिकांनी मोर्चा काढत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. सुरुवातीला ‘पॉक्सो’ कलम न लावल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com