Cape News : कुडचडेत पणजीप्रमाणेच ‘स्‍मार्ट घाेटाळा’ : राजेंद्र काकोडकर

Cape News : मलनिस्‍सारण वाहिनी टाकण्याच्या नावाने रस्‍त्‍याची चाळण
Cape
CapeDainik Gomantak

Cape News :

केपे, मलनिस्‍सारण वाहिनी घालण्‍याच्‍या नावाखाली कुडचडे शहरातील सर्व रस्‍त्‍यांची चाळण करून टाकल्‍यामुळे आता पावसात हे रस्‍ते खचू लागले आहेत.

एकाबाजूने स्‍मार्ट सिटीच्‍या नावावर पणजीत मोठा घोटाळा करून ठेवल्‍याचा आरोप होत असतानाच आता कुडचडेतही हे मलनिस्‍सारण वाहिनीचे काम म्‍हणजे आणखी एक ‘स्‍मार्ट घाेटाळा’च आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकोडकर यांनी केली.

काही दिवसांपूर्वी या वाहिनीच्‍या चेंबरवरून बस जाताना चेंबर फुटून बस खड्ड्यात गेली होती. याच पार्श्वभूमीवर आता कुडचडेच्‍या या स्‍मार्ट घोटाळ्‍यावर चर्चा होऊ लागली आहे. वास्‍तविक मलनिस्‍सारण प्रकल्‍प सुरू करताना जे नियोजन करण्‍याची गरज होती तेच मुळात झालेले नाही. त्‍यामुळे या कामावर खर्च केलेला सर्व पैसा पाण्‍यात गेल्‍यासारखाच आहे, अशी टीका या काकोडकर यांनी केली.

Cape
Goa Traffic Rules: वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा; गोवा कॅनकडून मागणी

कुडचडे पालिका क्षेत्रात मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असून यासाठी रस्त्याच्या मधोमध जागोजागी चेंबर बांधले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी लोकांनी केली आहे.

कुडचडेत भूमिगत वीजवाहिन्या व मलनिस्सारण वाहिनीच्या कामात जरा उशीर झाल्याने लोकांना त्रास होत आहे. मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर बांधण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून चेंबरचे बांधकाम केले होते; पण काही ठिकाणी शेतजमिनीची माती घालून खड्डे बुजविल्याने ती माती पावसाच्या पाण्यामुळे खचू लागली आहे.

- नीलेश काब्राल, आमदार

बऱ्याच ठिकाणी जे खड्डे खोदले होते ते बुजविण्यासाठी माती घातली होती ती अपुरी पडल्याने वाहने रुतून पडण्याचे प्रकार घडत आहेत. या कामात संबंधित कंत्राटदार दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करावी. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.

- बाळकृष्ण होडारकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com