Goa: कुडचडेत अनोखे लेखणी, पेन प्रदर्शन! शिवकालीन, मुघलकालीन, देशाबाहेरील विविध लेखण्या बघायची संधी

Chandrabhaga naik school pen exhibition: चंद्रभागा तुकोबा नाईक शाळा संकुलाने आयोजित केलेल्या अनोख्या अशा लेखणी, पेन, शाई व लिखाणासंबंधी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
chandrabhaga naik school pen exhibition
chandrabhaga naik school pen exhibitionDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: कुडचडे येथील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक शाळा संकुलाने आयोजित केलेल्या अनोख्या अशा लेखणी, पेन, शाई व लिखाणासंबंधी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. गोव्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन होते.

शेखर गोपी नाईक यांनी गेल्या पंचवीस वर्षात विविध प्रकाराची पेन व लेखण्या संग्रहित केल्या असून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात येत असलेल्या लेखण्या व मोगल साम्राज्यात वापरात असलेल्या लेखण्या भारतात व भारताबाहेर जुन्या काळी वापरत असलेल्या लेखण्या शाईचे पेन,

शाईचे दौत, विविध प्रकारची व विविध आकाराचे पेन, कलम, लेखण्या, शाई , बदलत्या काळात वापरात असलेली पेन यात पंचवीस हजार रुपयांपासून एक रुपयांपर्यंत किमतीचे पेन असे सुमारे पाच हजार वेगवेगळे पेन व लेखण्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

chandrabhaga naik school pen exhibition
Goa Cashew Fest: फक्त काजू नाही, मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पणजीत रंगणार तीन दिवसीय 'काजू महोत्सव'

श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य सुगंधा भट यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक विजयकुमार कोप्रे यांनी आभार मानले.

chandrabhaga naik school pen exhibition
Purumentachem Fest: प्राचीन काळापासून गोवा-कोकणातील निसर्गपूजक असणारा शेतकरी, पुरुमेंताची परंपरा

शाईची दऊत, बॉलपेन, लेखण्यांचा समावेश

प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकाराच्या पेनच्या नीभ , बॉल पेन, फांऊटेन पेन, शाईचे पेन, बोरू व इतर प्रकारची पेन तसेच शाईचे दौतही प्रदर्शनात होते. या प्रदर्शनाला श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय व सर्वोदया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ राजेश्वर नाईक व विविध मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com