Cuncolim: कुंकळ्‍ळी मुख्‍याधिकाऱ्यांनी ‘प्रोटेक्‍शन मनी’ घेतले का? गोवा खंडपीठाचे चौकशीचे निर्देश; सर्व बांधकामे स्‍कॅनरखाली

Cuncolim illegal construction: कुंकळ्‍ळीतील एका बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करण्‍यासाठी कुंकळ्‍ळी पालिकेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांनी ‘प्रोटेक्‍शन मनी’ घेतल्‍याचा गंभीर आरोप होत आहे.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

मडगाव: कुंकळ्‍ळीतील एका बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करण्‍यासाठी कुंकळ्‍ळी पालिकेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांनी ‘प्रोटेक्‍शन मनी’ घेतल्‍याचा गंभीर आरोप होत आहे. त्‍याची दखल पालिका संचालकांनी घेऊन सखोल चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने देतानाच पालिकेची परवानगी न घेता कुंकळ्‍ळीत जी बांधकामे उभारण्‍यात आली आहेत, त्‍यांची चौकशी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

‘ग्रीन गोवा फाऊंडेशन’ या संघटनेने कुंकळ्‍ळीतील एका बांधकामाविरोधात कुंकळ्‍ळी पालिकेकडे तक्रार केल्‍यानंतर पालिकेने घरमालकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली होती. या नोटिशीला उत्तर देताना त्‍या घरमालकाने आपण बांधकामासाठी ‘प्रोटेक्‍शन मनी’ दिल्‍याचा दावा केला होता.

त्‍यानंतर फाऊंडेशनच्‍या सचिव जॉर्जिना परेरा यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात रिट याचिका दाखल केली. न्‍या. महेश सोनक आणि न्‍या. निवेदिता मेहता यांनी ही याचिका निकालात काढताना, ज्‍या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रार दाखल केली होती, ते बांधकाम १५ दिवसांच्‍या आत पाडावे आणि कुंकळ्‍ळीत आणखी अशी बेकायदेशीर बांधकामे असल्‍यास त्‍यांच्‍यावरही कारवाई करावी असे म्‍हटले आहे.

Court Order
Goa Assembly : 'गोरगरिबांना परवडणारी घरे देण्‍याची प्रक्रिया सुरू', CM सावंतांचे स्पष्टीकरण; 'लिलाव प्रक्रिया बंद करा', तुयेकरांची मागणी

घरमालकाला संधी दिलीच कशाला?

न्‍यायालयात कुंकळ्‍ळी पालिकेची बाजू मांडताना ॲड. संदेश पडियार यांनी सांगितले की, सदर बांधकाम तीन महिन्‍यांत नियमित करण्‍याची संधी दिली होती. मात्र हा अवधी निघून गेल्‍यानंतरही घरमालकाने हे बांधकाम नियमित केल्‍याचा कुठलाही दाखला सादर केला नाही, याकडे लक्ष वेधले. तर, न्‍यायालयाने कुंकळ्‍ळी मुख्‍याधिकाऱ्यांच्‍या भूमिकेवर आक्षेप घेताना जर हे बांधकाम बेकायदेशीर होते, तर बांधकाम मालकाला ते नियमित करण्‍याची संधी द्यावी असे त्‍यांना का वाटले? असा सवाल उपस्‍थित केला.

Court Order
Cuncolim: कुंकळ्ळीत पुन्हा रस्ता खोदल्याने संताप! कंत्राटदाराची मनमानी; पावसाळ्याच्या तोंडावर वीजवाहिनीचे काम

पुढील तीन महिन्‍यांत कारवाईची माहिती द्या

सदर बेकायदेशीर बांधकामाला आत्तापर्यंत बरेच संरक्षण देण्‍यात आले आहे असे एकंदर प्रकरण पाहिल्‍यास वाटते. त्‍यामुळे बांधकाम पाडण्‍यास कामगार मिळाले नाहीत ही सबब पुढे करून कारवाई पुढे ढकलण्‍याचा प्रयत्‍न करू नये, अशी सूचना उपजिल्‍हाधिकाऱ्यांना करताना तीन महिन्‍यांत या कारवाईची संपूर्ण माहिती नगरपालिका संचालकांनी न्‍यायालयात सादर करावी, असे सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com