Cumbarjua: कुंभारजुवेत रस्त्यांच्या ‘हॉटमिक्सिंग’चा प्रस्ताव मंजूर; पावसाळ्यानंतर ५६ कोटींच्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु होणार

Kumbharjua: राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आल्यावर मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे
Kumbharjua: राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आल्यावर मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे
Goa ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

Cumbarjua Road|Cumbarjua Underground Electric Cable

पणजी: कुंभारजुवे मतदारसंघात १७ रस्त्यांचे हॉटमिक्सिंग करण्याचे काम शासनाने मंजूर केले आहे परंतु भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम पूर्ण न झाल्याने हे काम अडकून पडल्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. पावसाळ्यानंतर ५६ कोटी रुपयांच्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आल्यावर मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. यावेळी करमळीचे सरपंच कुष्टा सालेलकर, उपसरपंच रेश्मा मुरगावकर, प्रभाग सदस्य सुदेश कुंडईकर, पंच सदस्य राजेश नार्वेकर, ॲड.भुवनेश्वर फातर्पेकर, राजेश नाईक, अँजेला वालादारेस, जयेश नाईक आणि टेओफ्लिना कार्दोज तसेच गटविकास अधिकारी प्रीतेश शेरे आणि सचिव सन्मेश सावंत उपस्थित होते.

Kumbharjua: राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आल्यावर मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे
Cumbarjua Panchayat: कुंभारजुवा सरपंचपदी सचिन गावडे यांची वर्णी; आमदार फळदेसाई यांनी केले अभिनंदन

करमळी येथील सुलभ सामुदायिक शौचालय सुविधेचे व विद्यमान पंचायत घर हॉलच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

आमदार फळदेसाई यांनी करमळी तलाव प्रकल्पाबाबत काम पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले कि, ५.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा काढण्यात आली आणि ती देण्यात आली होती परंतु यशस्वी बोलीदाराने कामगिरीची हमी न दिल्याने आम्हाला करार रद्द करावा लागला. आता पुन्हा निविदा काढण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थीनंतर कामाला सुरुवात होईल.

Kumbharjua: राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आल्यावर मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे
Goa Electricity Department: वीजेच्या लपंडावाने दक्षिण गोव्यात जनता त्रस्त

सभागृह करमळी ग्रामस्थांसाठी वरदान

फळदेसाई म्हणाले की, नूतनीकरण केलेला सभागृह करमळी ग्रामस्थांसाठी वरदान ठरणार आहे. या सभागृहामुळे करमळी पंचायतीतील लोकांना लग्न किंवा इतर कोणत्याही मोठ्या समारंभासाठी खूप फायदा होईल. प्रशस्त सभागृहासाठी त्यांना पणजी किंवा इतर दूरच्या ठिकाणी जाण्याऐवजी, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हा सभागृह यीग्य आहे. वाढदिवस किंवा लग्नसमारंभात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी इन्व्हर्टर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com