CRZ Goa Regulations
CRZ Goa RegulationsDainik Gomantak

CRZ Goa: किनारी भागात सीआरझेड हीच समस्या! स्थानिकांना सजा तर बिगर गोमंतकीयांची मजा

स्थानिक रहिवाशांना एखादा व्यवसाय थाटायचा असेल तर सीआरझेड विभागामुळे मोठ्या अडचणी येतात.
Published on

CRZ Goa Regulations : मांद्रे मतदारसंघाला सर्वांग सुंदर असा मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल आणि केरी तेरेखोल या गावांना किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यावर सीआरझेड कायद्यामुळे मोठी समस्या भेडसावत आहे. स्थानिक रहिवाशांना एखादा व्यवसाय थाटायचा असेल तर सीआरझेड विभागामुळे मोठ्या अडचणी येतात.

मात्र, बिगर गोमंतकीयांना तशा अडचणी येत नसल्यामुळे त्यांचेच किनारी भागात मोठ्या इमारती, बंगले, हॉटेल्स, क्लब उभे राहतात. तर स्थानिक आणि एखादी साधी खोली बांधली तर सीआरझेड विभाग लगेच कारवाईसाठी धावपळ करतो.

CRZ Goa Regulations
Margao Carnival 2023 : मडगाववासीयांनी लुटला ‘कार्निव्हल’ आनंद; प्रेक्षकांची तुफान गर्दी

मांद्रे मतदार संघात एकूण नऊ पंचायतींचा समावेश आहे. त्यात केरी तेरेखोल पालये, हरमल, मांद्रे मोरजी आगरवाडा, चोपडे, पार्से तुये आणि विर्नोडा या पंचायतींचा समावेश आहे. परंतु केरे तेरेखोल, हरमल आश्वे मांद्रे, मोरजी या गावांना समुद्रकिनारा तर मोरजी आगरवाडा चोपडे या भागाला शापोरा नदीचा किनारा लाभलेला आहे. शिवाय केरी,पालये किरणपाणी या भागांनाही तेरेखोल नदीचा किनारा लाभलेला आहे.पण अवैध बांधकामांमुळे किनारी भागातील नैसर्गिक सौंदर्य लोप पावत आहे.

मोरजी पंच विलास मोरजे यांनी सांगितले की जर एखाद्या बांधकाम विरोधात तक्रार आली तर पंचायत कारवाई करते , सीआरझेड विभागात कोणत्याच बांधकामांना पंचायत परवाना देत नाही.

कायदा कागदावर भक्कम !

सीआरझेड कायदा कागदावर भक्कम वाटतो. समुद्र रेषेच्या दोनशे मीटर अंतरात कसलेच पक्के बांधकाम करता येत नाही.1991 पूर्वीचे एखादे बांधकाम असेल, त्या ठिकाणी जुने घर, वास्तू असेल तर त्याला सीआरझेड विभाग एकूण नऊ मीटर उंचीच्या बांधकामास पुनर्बांधणीस परवानगी देते.

परंतु नवे बांधकाम 200 मीटर अंतरात करण्यास परवाना देत नाही. परंतु कायद्यातील पळवाटांचा आधार घेत बिगर गोमंतकीय उद्योजकांनी किनारी भागातील जुनी घरे,जमिनी बांधकामासह विकत घेतली आहेत. जुन्या घरांचे नंबर वापरून तिथे नवे बांधकाम केल्याचे दिसत आहे. वाळूच्या टेकड्या उद्ध्वस्त करून शेकडो भलीमोठी बांधकामे उभी राहिली.त्यांना कोणाचा आश्रय आहे, हे गुलदस्त्यातच आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आणि मंत्र्यांनी जमिनी विकत घेतल्या आणि बांधकामे सुरू केली,त्यांना कसा सीआरझेड कायदा लागत नाही.

-अशोक नाईक,

रहिवाशी मोरजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com