मडगाव येथे पारंपरिक मार्गाने कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. ‘खा, प्या मजा करा,’ असा संदेश किंग मोमो रुझेल डिसोझा यांनी मडगाववासीयांना यावेळी दिला.
पर्यावरणमंत्री रोहंन खंवटे यांनी सायंकाळी 4 वा. होली स्पिरिट चर्च येथे बावटा दाखवून चित्ररथ मिरवणुकीची सुरुवात केली होती. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स ,नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगावचे नगरसेवक व इतर उपस्थित होते.
होली स्पिरिट चर्च ते मडगाव नगरपालिका चौक येथे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून लोकांनी चित्ररथ मिरवणुकीचा आनंद लुटला. चित्ररथ मिरवणुकीसहित विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केलेले कलाकार लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
होली स्पिरिट चर्च पासून नगरपालिका चौकापर्यंत मुखवटे व पताका लावून रस्ता सजविण्यात आला होता. या मिरवणुकीत पर्यावरण जतन, संवर्धनाचे संदेश देणारे, गोव्याचा पारंपरिक व्यवसाय दर्शविणारे चित्ररथ सहभागी झाले होते. कार्निव्हलच्या या मिरवणुकीत गोव्यातील राहणीमान, संस्कृती ,कला, व्यवसाय, चर्चमध्ये लग्नसोहळ्यासाठी सूट घातलेला नवरदेव आणि सफेद गाऊनमधील वधू,पांढऱ्या झग्यातील पाद्री आणि माद्री, बाल्कनीत गिटार वाजवणारे तरुण-तरुणी असे पाश्चात्य आणि गोमंतकीय संस्कृतीचा मिलाफ असलेले चित्ररथ मिरवणुकीत होते.
45 चित्ररथांचा समावेश
गोव्यातील पारंपरिक खाद्य पदार्थ, पाव विक्रेते पोदेर यांचा चित्ररथ, भाजी विक्रेत्यांचे चित्ररथ, मासळी विक्रेत्यांचे चित्ररथ, गोव्यातील प्रमुख सणांमध्ये बनवण्यात येत असलेल्या खाद्य पदार्थांचे चित्ररथ, पर्यावरण संतुलित राखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आलेले बांबू, वस्तूंचे, बेडूक वाचवा, वन्यजीव, प्राणी यांचे चित्ररथ लोकांचे लोकांचे खास आकर्षण ठरले होते. या मडगावच्या कार्निव्हल मध्ये गोव्यातील विविध भागातील 40 ते 45 चित्ररथांचा समावेश होता.
बुद्धिबळपटू दिया सावळचा सत्कार
मडगावच्या नगरसेविका दीपाली सावळ यांची गोव्यातील उगवती बुद्धिबळ खेळाडू असलेली कन्या दिया सावळ हिचा इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.