Sea Tourism: गोव्यात सागरी पर्यटन हंगाम सुरु! देशी-विदेशी जहाजांनी मुरगाव बंदर गजबजणार

Mormugao Port: यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून १२०१७ पर्यटक आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत
Mormugao Port: यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून १२०१७ पर्यटक आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत
Goa Sea Tourism|Mormugao PortDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sea Tourism Season

वास्को: एमव्ही एम्प्रेस (MV Empress Cruise) या देशांतर्गत जहाजाने २०२४-२५ या सागरी पर्यटन हंगा‌माला सुरवात होणार आहे. हे पर्यटक जहाज मुरगाव बंदरात मुंबईमार्गे १८०० पर्यटक व या जहाजावरील ६०० कर्मचारी मिळून २४०० पर्यटक घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.

तर गुरुवार, ५ डिसेंबर रोजी ‘सेलेब्रिटी मिलेनियम’ (Celebrity Millennium)हे या हंगामातील पहिले विदेशी पर्यटक जहाज मुंबईमार्गे २०३४ पर्यटक व ८५० जहाजावरील कर्मचारी वर्ग मिळून २८८४ देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात (Mormugao Port) दाखल होणार आहेत. २०२४-२५ या पर्यटन हंगामात ‘एमव्ही’ या देशांतर्गत जहाजाच्या एकूण ३० फेऱ्या १४ जून २०२५ पर्यंत असणार असून यातून ६१,०२० पर्यटक तर या जहाजावरील १८ हजार कर्मचारी वर्ग मिळून ७९,०२० देशी विदेशी पर्यटक दाखल होणार आहेत.

दरम्यान, यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून १२०१७ पर्यटक तर ५२९२ या जहाजातील कर्मचारी वर्ग मिळून १७,३०९ देशी-विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत.

यात पहिले ‘सेलेब्रिटी मिलेनियम’ हे विदेशी पर्यटक जहाज ५ डिसेंबर रोजी कोचीनमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात २०३४ पर्यटक व या जहाजावरील ८५० कर्मचारी मिळून २८८४ देशी-विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.

तसेच या जहाजाची दुसरी फेरी रविवार, ८ डिसेंबर रोजी मुंबईमार्गे मुरगाव बंदरात येणार असून २८८४ पर्यटक दाखल होणार आहेत. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी मुंबईमार्गे मुरगाव बंदरात सेव्हन सीस व्होएजर (Seven Seas Voyager Luxury Cruise Ship) हे विदेशी जहाज ७०० पर्यटक व ४२० कर्मचाऱ्यांसह ११२० जणांना घेऊन येणार आहे. या जहाजाने २०२४-२५च्या पहिल्या टप्प्याची सांगता होईल.

‘सिल्वर व्हीस्पर’ठरणार हंगामातील अखेरचे विदेशी जहाज

शनिवार, १ मार्च २०२५ रोजी न्यू मंगळूरमार्गे ‘ब्रीडीयन स्काय’ (Hebridean Sky)हे विदेशी पर्यटक जहाज मुरगाव बंदरात १२० पर्यटक व ५८ कर्मचारी मिळून १७८ देशी-विदेशी पर्यटक घेऊन दाखल होणार आहे. २०२४-२५ या सागरी पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज ‘सिल्वर व्हीस्पर’ (Silver Whisper Cruise) सोमवार, १२ मे २०२५ रोजी कोचीनमार्गे ४३५ पर्यटक व जहाजावरील ३०५ कर्मचारी मिळून ७४० जणांना घेऊन मुरगावात दाखल होणार आहे.

Mormugao Port: यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून १२०१७ पर्यटक आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत
Sea ​​Tourism : समुद्री पर्यटन हंगामाची सांगता; शेवटचे पर्यटक जहाज दाखल

‘हेरगिरी’चा कंपन्यांना धसका

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा विदेशी जहाजांची संख्या कमी होण्याचे कारण हल्लीच विदेशी शक्तींना कारवारमधील ''आयएनएस कदंब’ या आशियातील सर्वांत मोठ्या नौदल तळाची संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी (नौदल हेरगिरी) तिघांवर कारवाई करण्यात आली होती. याचा धसका विदेशी शिपिंग कंपन्यांनी घेतला असून या भीतीपोटी काही विदेशी जहाजांनी तसेच गोव्यात व इतर भागात येण्यास हरकत घेतली असल्याचे सांगितले.

पर्यटन हंगामाची सांगता शनिवार, १४ जून २०२५ रोजी ‘एमव्ही एम्प्रेस’ या देशांतर्गत जहाजाद्वारे होणार आहे. तसेच २०२४-२५ या सागरी पर्यटन हंगामात देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटक जहाजातून एकूण ८९,३०९ देशी विदेशी पर्यटक गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. सदर सर्व जहाजे जे.एम.बक्षी शिपिंग कंपनीच्या प्रायोजनाखाली दाखल होणार आहेत.

गोविंद पेर्नूलकर, ‘जे एम बक्षी’चे सरव्यवस्थापक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com