Vagator Beach: वागातोरच्या ‘रोमियो लेन’वर पुन्हा प्रशासनाचा हातोडा; अवैध बांधकामवाल्यांचे धाबे दणाणले

Vagator Beach: पर्यटन विभागाकडून वझरांत-वागातोर येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले
Vagator Beach
Vagator BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Administration action on illegal construction of Vagator 'Romeo Lane': काल शनिवारी वझरांत-वागातोर येथील किनारी भागात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या ‘रोमियो लेन’ या रेस्टॉरंटचा बराचसा भाग शनिवारी (ता.27) गोवा पर्यटन मंडळाकडून जमीनदोस्त करण्यात आला.

उच्च न्यायालयाकडून हल्लीच देण्यात आलेल्या एका आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. आज रविवारी पुन्हा याच रेस्टोरंन्टवर आणि नजीकच्या शॅकसाठीच्या अवैध बांधकामावार कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Vagator Beach
Mardol: म्हार्दोळच्या मळेकरांना दिलासा; ग्रामसभेत सरपंचांनी दिलंय आश्वासन, 'मुख्य रस्त्यावरच्या...'

रॉबर्ट कुतिन्हो व अँटोनियो डिसोझा यांच्या मालकीच्या 'रोमियो लेन' या शॅकच्या अवैध बांधकामावार कारवाई केल्याने या परिसरासहित गोव्यातील अन्य किनारी भागातील अवैध बांधकामवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पर्यटन खात्याकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे. या घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर असं समजतं की, या अवैध बांधकामांविरोधात स्थानिकांनी वेळोवेळी आवाज उठवला होता.

रात्रभर मोठ्या आवाजातील संगीत लावून चालणाऱ्या नाईट पार्ट्या तसेच या पार्ट्यांच्या नावाखाली रेस्टोरंन्टमध्ये चालणारे बेकायदेशीर धंदे यामुळे उपद्रव वाढला असल्याचे इथल्या रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

हणजूण, वागातोर, कळंगुट सारख्या किनारीभागात अवैध बांधकामांचे आणि बेकायदेशीर धंद्यांचे पेव फुटले असून स्थानिकांनी वेळोवेळी यासंबंधीच्या तक्रारी पोलिसांत दिल्या आहेत.

दरम्यन पर्यटन विभागाकडून वझरांत-वागातोर येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com