Panaji News : नवनिर्वाचित ३१ टक्के खासदारांवर गुन्हे; भास्कर असोल्डेकर यांची माहिती

Panaji News : यंदा उमेदवारांच्या संख्येत (३०६) तसेच करोडपती उमेदवारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चारवेळच्या लोकसभेच्या आकडेवरून गंभीर फौजदारी गुन्हे असलेले उमेदवार निवडून येण्याची संख्या वाढत आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्सचे (एडीआर) भास्कर असोल्डेकर यांनी दिली.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, लोकसभेवर निवडून आलेल्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी २५१ (४६ टक्के) जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे आहेत. त्यातील १७० (३१ टक्के) जणांविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हे आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी उमेदवारांनी केलेला खर्च अडीचपटीने आहे.

यंदा उमेदवारांच्या संख्येत (३०६) तसेच करोडपती उमेदवारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चारवेळच्या लोकसभेच्या आकडेवरून गंभीर फौजदारी गुन्हे असलेले उमेदवार निवडून येण्याची संख्या वाढत आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्सचे (एडीआर) भास्कर असोल्डेकर यांनी दिली.

२०२४ मध्ये लोकसभेसाठी ८,३६० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १,६४३ (२० टक्के) उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. त्यातील १७० जणांविरुद्ध गंभीर आरोपांचे गुन्हे नोंद आहेत. निवडून आलेल्या ५४३ उमेदवारांपैकी ५०४ (९३ टक्के) करोडपती आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराची सरासरी मालमत्ता ४६.३४ टक्के आहे.

Crime News
Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ३२७ हे ५० ते ७० वयोगटातील आहेत. त्यापाठोपाठ ४१ ते ५० वयोगटातील ११४ जण आहेत. २५ ते ४० वयोगटातील युवा नेत्यांमध्ये ५८ उमेदवार आहेत. ४३ उमेदवार ७१ ते ८० वयोगटामधील तर एकमेव उमेदवार ८१ ते ९० वयोमर्यादेमधील आहे.

उमेदवारांची ‘पात्रता’

विजयी उमेदवार शैक्षणिक पात्रतेत निरक्षर (१), ५वी उत्तीर्ण (२), ८वी उत्तीर्ण (४), दहावी उत्तीर्ण (३४), बारावी उत्तीर्ण (६५), पदवीधर (१४७), पदव्युत्तर व्यावसायिक (९८), पदव्युत्तर (१४७), डॉक्टरेट (२८) व डिप्लोमा (१७).

निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या व टक्केवारी मालमत्तेच्या गटवारीनुसार

मालमत्ता १० कोटी व त्यावर २२७ (४२ टक्के)

मालमत्ता ५ कोटी ते १० कोटी १०३ (१९ टक्के)

मालमत्ता १ कोटी ते ५ कोटी १७४ (३२ टक्के)

मालमत्ता २० लाख ते १ कोटी ३५ (६ टक्के)

मालमत्ता २० लाखांहून कमी ४ (१ टक्का)

निवडून आलेल्या उमेदवारांमधील गुन्हे

व गंभीर गुन्हे असलेल्यांची वाढती संख्या

वर्ष विजयी उमेदवार गुन्हे असलेले टक्केवारी गंभीर गुन्हे असलेले टक्केवारी

२००९ ५४३ १६२ ३० टक्के ७६ १४ टक्के

२०१४ ५४२ १८५ ३४ टक्के ११२ २१ टक्के

२०१९ ५३९ २३३ ४३ टक्के १५९ २९ टक्के

२०२४ ५४३ २५१ ४६ टक्के १७० ३१ टक्के

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com