Amit Patkar: भाजपचा 'कोरोना' सोयीनुसार पसरतो; अमित पाटकर यांची खोचक टीका

भारत जोडो यात्रेच्या प्रचंड यशाने भाजप धास्तावले आहे
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना आता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची परवानगी घेतो आणि भाजप सरकारच्या राजकीय सोयीनुसार पसरतो, असा आरोप गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रचंड यशाने धास्तावलेल्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचाचा हवाला देत यात्रा थांबवण्यासाठी पत्र लिहिले. मात्र राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवीन झुआरी पुलावरील कार्यक्रमासाठी जनतेला मोठ्या संख्येने येण्याचे खुले आमंत्रण देत आहेत असेही पाटकर म्हणाले.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना पुलाच्या गुणवत्तेवर माध्यमांनी प्रश्न विचारला होता यावेळी तो कंत्राटदाराकडे सोपवला होता. भाजपच्या इनहाऊस इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन तीन दिवस पुढे ढकलल्याने जनतेची गैरसोय झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याची दखल घेतील का? असा सवाल पाटकर यांनी केला.

यात साजरा करण्यासारखे काही नाही आहे. नवीन झुआरी पूल गुणवत्ता चाचणी पास करू द्या. गोवावासीयांना "अटल सेतू" वर भयानक स्वप्नांचा सामना करावा लागत आहे. अटल सेतू प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही उद्घाटनही अशाच जोशाने झाले होते. हा पूल अजूनही अपूर्णच आहे याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी गोव्यातील जनतेला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे गोवावासीयांनो पुलावर आपला जीव धोक्यात घालू नका असे आवाहन पाटकर यांनी केले. करदात्यांच्या पैशातून हा पूल बांधण्यात आला असून गोवावासीयांना भेट देण्यासाठी ही भाजपची खासगी मालमत्ता नाही असा टोलाही त्यांनी भाजपावर लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com