Goa Engineering Student: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला सलाम!

शालेय मुलांचीही कमाल: ‘क्षितिज 2023 ’ प्रदर्शनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची निर्मिती
Goa Engineering Student
Goa Engineering StudentDainik Gomantak
Published on
Updated on

डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘क्षितिज 2023’ या प्रदर्शनाचे आयोजन केले असून यात वैज्ञानिक व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे. शालेय व उच्च माध्यमिकस्तरीय विद्यार्थ्यांनीही सुमारे 87असे प्रकल्प निर्मित केले आहेत, त्यामुळे भविष्यात विविध कामांसाठी मानवी कष्टाची गरज भासणार नाही.

Goa Engineering Student
Goa Police: स्कूटरच्या बुकिंगचे आमिष; 300 हून अधिक ग्राहकांची फसवणूक, ठकसेनला गोव्यात अटक

सर्व काही तंत्रज्ञानावर आधारीत यंत्रेच माणसांचे काम सोपे करतील,याची प्रचिती एकंदर या प्रकल्पांतून येत होती.

ड्रोनने काढता येणार नारळ

या ड्रोन द्वारे 17 मिनिटांत एका माडाचे नारळ तोडता येतील एवढी क्षमता आहे. हा ड्रोन  तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सहकार्य लाभले आहे. या ड्रोनची निर्मिती प्रा.गौरीश सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली डेल्टन फर्नांडिस, क्लाईव्ह रॉड्रिग्स, ज्योस्टन रॉड्रिग्स, आर्तिका व समर्थ यांनी केली आहे.

Goa Engineering Student
'Paper Spray' Case : पालकांच्‍या चेहऱ्यांवर काळजी, शिक्षक गंभीर, विद्यार्थी संभ्रमात

सध्या या ड्रोनची चाचणी सुरू असून लवकरच तो मार्केटमध्ये उपलब्ध होईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

भिंती रंगवणारे यंत्र

या पुढे घरातील भिंती रंगवण्यासाठी माणसांची गरज भासणार नाही. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी असे एक यंत्र तयार केले आहे, जेणेकरुन भिंती रंगवता येऊ शकतील. हा प्रकल्प प्रा. सचिन तुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरोन रॉड्रिग्स, वेरोन कॉन्सेसाव डायस, सुर्यकांत एम. फडते, अब्दुल अझिम सलमान मोहमद व कौशिक गावडे यांनी तयार केला आहे.  हे सर्व विद्यार्थी यंदाच अंतिम वर्षात उत्तीर्ण झाले आहेत.  या यंत्रामुळे तीन मीटर उंचीच्या भिंती रंगवल्या जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com