किनारपट्टीचा भाग अत्यंत संवेदनशील असून येथील बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाईची गरज आहे, असे सांगत मुख्यमंत्री डॉ.
प्रमोद सावंत यांनी आज पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे लोक किनारपट्टी भागात व्यवसाय करतात. एवढेच नव्हे, तर इतर देशांतील लोकांचेही या भागात वास्तव्य असू शकते.
ही गोष्ट ध्यानात घेऊन या भागात सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी 15 मीटर वेगवान इंटरसेप्टर पेट्रोल बोट लाँच केली. वास्को गोवा शिपयार्ड येथे ही बोट गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलाकडे सोपविली. यावेळी 59 लाख 40 हजार रुपयांच्या तीन ड्रोन कॅमेऱ्यांचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष ब्रजेश कुमार उपाध्याय, मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स, मनुष्यबळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे, प्रवीणकुमार वस्त, शेख सलीम, पोलिस निरीक्षक राहुल परब, आनंद शिरोडकर, कपिल नायक, अमरनाथ पाशी, एलविटो फर्नांडिस, चंद्रकांत पाटील, शैलेश नार्वेकर व इतर पोलिस उपस्थित होते. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांचेही भाषण झाले. स्वागत पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन तर आभार पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी मानले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी बोट, ड्रोन कॅमेरे सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. हाय स्पीड आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त तीन ड्रोन खरेदी केली आहेत.
त्यांचा सुरक्षा व्यवस्थेसाठी फायदा होईल. त्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही दिले आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिस देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. जी-20बैठकांच्या आयोजनाची संधी मिळाली असून या संधीचे सोने करू.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.