‘G-20’ परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात!

आजपासून प्रतिनिधी दाखल : 19 देश आणि युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधींचा समावेश
Goa G-20 Summit
Goa G-20 Summit Dainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक अर्थव्यवस्थेसह देशाचा व्यापार, साधनसुविधांचा विकास आणि विविध क्षेत्रातील परस्पर देवाण-घेवाण यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जी-20 शिखर परिषदेची पहिली महत्त्वपूर्ण बैठक 17 ते 19 एप्रिलदरम्यान पणजीत होत आहे.

यानिमित्ताने 19 देश आणि युरोपियन महासंघाचे मिळून सुमारे 250 प्रतिनिधी आजपासून राज्यात दाखल होत आहेत. यासाठी राजधानी पणजीनगरी सजली असून प्रशासन सर्वतोपरी सज्ज झाले आहे.

जगभरातून येणाऱ्या या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी दिली.

Goa G-20 Summit
Bandodkar T-20 League: विजय नोंदवूनही धेंपो क्लब ‘आऊट’, पणजी जिमखाना ‘ब’ गटात अव्वल स्थानी

संजित रॉड्रिग्स म्हणाले की, जगभरातील 19 देश आणि युरोपियन महासंघ या ‘जी-20’ गटाचे सदस्य आहेत. दरवर्षी टप्प्याटप्प्याने चक्राकार पद्धतीने एका देशाकडे या परिषदेचे यजमानपद जाते. यंदा ते भारताकडे आहे.

भारतात होणाऱ्या 200 पैकी 8 बैठका गोव्यात होत आहेत. 17 एप्रिल ते 22 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने या बैठका होत असून प्रामुख्याने आरोग्य, पर्यटन, ऊर्जा विकास, जागतिक आर्थिक धोरण, विकासात्मक कामे या बाबींवर या बैठकांमध्ये चर्चा अपेक्षित आहे.

यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, अर्थ मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय सक्रिय आहे. राज्यात ठिकठिकाणी डागडुजी, नूतनीकरणही केले आहे.

Goa G-20 Summit
Goa Police: 68 गुंडांसह 760 जणांची धरपकड; 681 भाडेकरूंची कसून पडताळणी

कडेकोट बंदोबस्त-

प्रत्येक परिषदेसाठी वेगवेगळ्या देशांतील सुमारे 200 ते 250 प्रतिनिधी या बैठकांना हजर राहतील. यातील काही प्रतिनिधी हे जागतिक कीर्तीचे आणि अतिमहत्त्वाचे नेते आणि अधिकारी आहेत.

त्यामुळे त्यांच्यासाठीच्या साधनसुविधा, सुरक्षा महत्त्वाची आहे. याकरिता संपूर्ण राज्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय केली असून महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com