लसीच्या दुसऱ्या डोसबाबत गोवेकर उदासीन का?

खात्याकडून मेगा मोहीम : अजूनही दोन लाख लोक दुसऱ्या डोसविना
Covid vaccination
Covid vaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सुमारे 104 टक्के लोकांनी कोविडची (Covid) पहिली तर 73 टक्के लोकांनी दुसरी लस घेतली आहे. पहिली लस घेतलेल्यांपैकी 2 लाख 15 हजार लोकांनी 84 दिवस पूर्ण झाल्यानंतरही दुसरी लस घेतलेली नाही. याला केवळ लोकांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. लोकांनी लसीसाठी (Covid Vaccination) पुढे यावे, यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविली जात असल्याची माहिती आरोग्य सेवा संचनालयाच्या प्रभारी संचालिका डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली. पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र बोरकर आणि डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते.

Covid vaccination
'गोव्याची जनता कोविडमुळे त्रस्त मुख्यमंत्री संपत्ती गोळा करण्यात व्यस्त'

राज्यात देशी पर्यटकांची संख्‍या वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. राज्यात 31 टक्के लोकांना अजूनही दुसरी लस द्यायची आहे. राज्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 97.81 टक्के असला तरी ही महामारी संपलेली नाही, असे मत लसीकरण प्रमुख डॉ. बोरकर यांनी व्यक्त केले. सध्या केवळ देशी पर्यटक गोव्यात येत आहेत, काही दिवसांनी परदेशी पर्यटकही दाखल होतील. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे संकट टाळता येणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

20 केंद्र, 219 उपकेंद्रांवर सोय

ज्या 2 लाख 15 हजार जणांनी 84 दिवस पूर्ण झाल्यानंतरही दुसरी लस घेतलेली नाही त्‍यांच्‍यासाठी रविवारपासून 20 केंद्र आणि 219 आरोग्य उपकेंद्रातून लस देण्याची सोय करण्यात आली आहे. जागृतीसाठी आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

Covid vaccination
गोवा सरकारची तिजोरी रिकामी असताना नवे राजभवन बांधण्याचा अट्टहास का?

दोन्‍ही लस घेतलेल्या 19 जणांचा बळी

राज्यात कोविडची दुसरी लाट 1 मार्चला आली. तेव्हापासून आतापर्यंत 3 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 हजार 3559 जणांचे लसीकरण झाले नव्हते. 185 जणांनी केवळ एकच लस घेतली होती, तर ज्या 19 जणांनी दोन्ही लसी घेतल्या होत्या, त्यांना विविध प्रकारचे विकार होते. यावरून लसीकरण किती महत्त्‍वाचे आहे, हे स्पष्ट होते, असे डॉ. उत्कर्ष बेतोडकर म्हणाले.

सध्या शाळा सुरू झाल्याने पालकांमध्ये चिंता आहे. याची जाणीव आम्हांला आहे. त्यामुळेच 84 दिवस पूर्ण झालेल्यांचे लसीकरण करण्यावर आमचा भर आहे. लोकांनीही लस घेण्यासाठी पुढे यायला हवे. शाळकरी मुलांना लस देण्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल.

- डॉ. आयरा आल्मेदा, प्रभारी संचालिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com