Goa: बायणा किनाऱ्यावरील ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन प्रकल्प चर्चेत

बायणा किनाऱ्यावरील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन पुढे नेण्यास लाभदायक होणार असल्याचे वास्कोचे (Vasco) आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) यांनी सांगितले.
Bayana Coast
Bayana CoastDainik Gomantak
Published on
Updated on

मिरामार (Miramar) ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन (Blue Flag Certification) संबंधीची उच्च न्यायालयाकडून रद्द ठरविण्यात आलेल्या बायणा किनाऱ्यावरील नियोजित ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन प्रकल्प चर्चेत आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मिरामारमधील ब्लू फ्लॅग अधिसूचना रद्द ठरविताना कोणत्या प्रकारचे मुद्दे उपस्थित करण्यात आले यासंबंधी अभ्यास बायणा किनाऱ्यावरील ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन पुढे नेण्यास लाभदायक होणार असल्याचे वास्कोचे (Vasco) आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) यांनी सांगितले. बायणा किनाऱ्यावरील मच्छीमार बांधवांचे हित सांभाळूनच सदर प्रकल्प पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे वास्को बाजारपेठेला उर्जा मिळण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. स्थानिकांना तसेच मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊनचहा प्रकल्प पुढे नेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. मच्छीमार बांधवांना या प्रकल्पासंबंधी योग्य ती माहिती देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Bayana Coast
Goa : अंगणवाडी सेविकांचे कार्य अतुलनीय

बायणा किनारा हा मुरगाव मतदार क्षेत्रात येतो. मात्र, या प्रकल्पासंबंधी मुरगावचे आमदार व नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांनी मोठी उत्सुकता दाखविली नाही. याउलट सदर किनाऱ्याचा विकास व सौंदर्यीकरण करण्याचे काम पर्यटन विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडू सांगण्यात येत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी सांकवाळ येथील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी ब्लू फ्लॅग प्रमाणित समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारांना मासेमारी करण्यास कोणतीही अडचण नसेल असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान काब्राल (Minister Nilesh Cabral) म्हणाले, की ब्लू फ्लॅग अंतर्गत पोहणे, वॉटर स्पोर्टस्व गैरेंसाठी किनाऱ्यावरच वेगवेगळी क्षेत्रे असतात. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यावर अधिकाअधिक जागा मिळते जेणेकरून त्यांना मासेमारी व इतर संबंधित गोष्टी करण्यास कोणत्याही अडचण येत नाही. गोवा एक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे आम्हाला जागतिक पर्यटनाच्या बरोबरीने पावले टाकायला पाहिजेत. आज पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येण्यापूर्वी किनाऱ्यावर असलेल्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेतात.

Bayana Coast
Goa : निसर्ग-मानव यांचा समन्वय म्हणजे गोपाळकाला (Gopalkala)

ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित समुद्र किनाऱ्यांना त्यांची पसंती असते. ब्ल्यू फ्लॅगमुळे समुद्र किनाऱ्याचे कोणतेही व्यापारीकरण, खासगीकरण होणार नाही. ते किनारे राज्य सरकारच्या ताब्यातच असतील असे काब्राल यावेळी म्हणाले. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित झाल्यानंतर पर्यटकांसाठी सुमद्र किनाऱ्यावर येण्यास निर्बंध यापुढे नसतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोणीही समुद्रकिनारी येऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. येथील एक सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी बायणा किनाऱ्यावरील ब्लू फ्लॅगसर्टिफिकेशन प्रकल्पाला विरोध करणारा व्हिडीओ व्हायरल केला. या ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनसंबंधी संबंधित आमदार व मंत्री यांना कोणतेही ज्ञान नाही. त्यांनी यासंबंधी योग्य अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Bayana Coast
Goa Government कडून नोकऱ्यांचा लिलाव सुरूच

बायणा किनाऱ्यावर सुमारे 200 मच्छीमारी बोटी आहेत. पारंपारिक मच्छीमार येथे मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. असे त्यांनी म्हटले आहे. येथे सध्या पर्यटक येतात तेच खूप झाले. आणखीन पर्यटकांची गरज नाही. येथे दोन शॅक्स, वॉटर स्पोर्टस् इत्यादीसाठी परवानगी दिली आहे.मुरगाव सध्या कोळसा हब म्हणून प्रसिध्द झाले आहे. त्यासंबंधी इंटरनेटवर वाचून पर्यटक येथे येण्यास राजी होणार नाहीत, सड़ा येथील पायलट पॉईंट येथे पूर्वी पर्यटक येत होते. परंतु, आता ते स्थळ नामशेष झाल्याचा दावा पोळजी यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com