सरकारी रूग्णालयात उपचारासाठी कोविड अँटीजेन चाचणी बंधनकारक - राणे

Covid Antigen Test
Covid Antigen TestDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारी रूग्णालयात उपचारासाठी यापुढे कोविड अँटीजेन चाचणी (Covid Antigen Test) बंधनकारण करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोमेकॉसह जिल्हा आणि उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर कोविड चाचणी बंधनकारक असणार आहे. असे राणे म्हणाले.

आज दिवसभरात ८० नवे कोरोना बाधित

गोव्यात आज दिवसभरात ८० नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ६८२ एवढी झाली आहे. दिवसभरात १३५ बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आज एकही कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

Covid Antigen Test
Sangolda: जादा बिलावरून रेस्टॉरंट मालकाला शिवीगाळ, तीन वाहतूक पोलिस निलंबित

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समवेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयात होत असलेली रुग्णांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अनेक रुग्णांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याशिवाय या रुग्णांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार कशा पद्धतीने केले जातील, यावर ही चर्चा झाली.

Covid Antigen Test
Beach Shack License: बीच शॅक परवाना वैधता एका वर्षांनी वाढवली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com