पणजी: कोविड-19 (Covid 19) निर्बंधामुळे बंद असलेले गोव्यातील (Goa) इनडोअर क्रीडा स्टेडियम (Indoor sports stadium) पुढील आठवड्यात खुली करण्याबाबत क्रीडा सचिव जे. अशोक कुमार (J. Ashok Kumar) यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (Goa Olympic Association) (जीसीए) शिष्टमंडळाने मंगळवारी क्रीडा सचिवांची भेट घेतली. कोरोना विषाणू महामारीचा जोर ओसरल्यानंतर आऊटडोअर क्रीडा संकुले सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे, पण इनडोअर स्टेडियम अजूनही बंद असल्याने खेळाडूंची गैरसोय होत असल्याचे शिष्टमंडळाने क्रीडा सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात यापूर्वीच गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे (Sandeep Heble) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. सचिव गुरुदत्त भक्ता यांच्या नेतृत्वाखालील आयओए शिष्टमंडळात संदीप हेबळे, राजेंद्र गुदिन्हो व हेमांग दोशी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने क्रीडा सचिवांना निवेदन सादर केले.
प्रलंबित अनुदानावर चर्चा
क्रीडा उपक्रम सुरू करण्यासाठी इनडोअर स्टेडियम खुली होण्याची नितांत गरज क्रीडा सचिवांना सादर केलेल्या निवेदनात प्रतिपादली आहे. मागील काही दिवसांतील जोरदार पावसामुळे चिखली-वास्को येथील इनडोअर स्टेडियमसा हानी पोहचली आहे, तेथे डागडुजी आवश्यक असल्याचे आयओएने निवेदनात नमूद केले आहे. क्रीडा सचिवासमेवतच्या भेटीत आयओए शिष्टमंडळाने विविध राज्यस्तरीय क्रीडा संघटनांचे प्रलंबित असलेल्या अनुदानासंदर्भातही चर्चा केली.
पुढील आठवड्यात मंजुरी शक्य
राज्यातील आऊटडोअर खेळांवरील निर्बंध मागे घेण्यात आल्याने तेथे क्रीडापटू सराव आणि खेळू शकतात ही बाब क्रीडा सचिव जे. अशोक कुमार यांनी स्पष्ट केली. येत्या सोमवारनंतर (ता. 12) इनडोअर स्टेडियमवरील निर्बंध हटविण्याचे त्यांनी संकेत दिले. त्यामुळे पुढील आठवड्यापासून क्रीडापटूंना इनडोअर स्टेडियम सराव व खेळण्यासाठी वापरण्यास मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.