Goa Cyber Crime: बनावट फेसबुक खात्यातून चुलत बहिणीचीच बदनामी

Goa Cyber Crime: धक्कादायक प्रकार: पुरुषाच्या नावाने नोंदणी
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cyber Crime: घराघरातील स्पर्धा आता एकमेकींच्या बदनामीपर्यंत पोचली आहे. म्हापसा परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. पुरुषाच्या नावाचे सुरू असलेले फेसबुक खाते, हे बदनामी झालेल्या मुलीच्या चुलत बहिणीनेच तयार केले होते, हे पोलिस तपासात आढळून आले आहे. धक्कादायक असा हा प्रकार आहे.

Cyber Crime
Goa Politics: ख्रिस्ती मंत्र्याची गच्छंती अटळ

याप्रकरणी सायबर गुन्हे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका मुलीची अन्य व्यक्तीसोबत छायाचित्रे जोडून ती मॅसेंजर व अन्य साधनांनी समाज माध्यमांवर जारी करण्यात आली होती. त्या मुलीला ही बाब समजल्यावर धक्का बसला. तिने याविषयी पोलिसात तक्रार दिली.

व्ही. के. माने नावाच्या या फेसबुक खात्याची माहिती पोलिसांनी घेणे सुरु केल्यावर एका मुलींच्या मोबाईलवरून ते चालवले जात असल्याचे आढळून आले. त्या खाते चालवणाऱ्या मुलीची माहिती पोलिसांनी मिळवल्यावर त्यांना धक्काच बसला कारण एका मुलीच्या बदनामीस कारण ठरलेले फेसबुक खाते तिचीच चुलत बहीण चालवत होती.

Cyber Crime
National Games 2023: आकांक्षा अंतिम फेरीत, वुशू खेळात तिसरे पदक

बदनामी करताना त्या मुलीने आपल्या चुलत बहिणीचा मोबाईल क्रमांक दिल्याने तिला मानहानिकारक संदेशांना तसेच दूरध्वनी कॉल्सना सामोरे जावे लागले होते. हा प्रकार निदर्शनास येताच पीडिताने सायबर क्राईम पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार ११ सप्टेंबर २०२३ पूर्वी घडला होता. म्हापसास्थित पीडित युवतीच्या तक्रारीच्या आधारे सायबर क्राईमने शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६६ क व ६७ कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला. तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपासही सुरू केला होता.

...अटक होणार?

पोलिस चौकशीवेळी हा बनावट फेसबूक अकाऊंट पीडिताच्या चुलत बहिणीनेच तयार केला असून तिनेच बदनामी केली आहे, असे पोलिसांना आढळून आले. तसेच पूर्ववैमनस्यातून संशयित तरुणीने हा गुन्हा केल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान, या संशयित तरुणीला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देयकर करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com