गोवा विद्यापीठात 8 मार्चपासुन पीएचडी प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

विद्यापीठ 8 ते 25 मार्च दरम्यान प्रवेशासाठी त्यांच्या पोर्टलवर अर्ज स्वीकारेल आणि 11 ते 13 एप्रिल दरम्यान मुलाखती घेतल्या जातील.
Goa University
Goa University Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठ राज्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) आणि नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन यासारख्या राष्ट्रीय संस्थांसह विद्यापीठ आणि संलग्न संस्थांमध्ये डॉक्टरेट प्रोग्रामच्या जागांसाठी 8 मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. (admission process for PhD will start from 8 march at Goa University)

Goa University
बाणावलीमध्ये जिंकुन येण्याचा चर्चिल यांनी व्यक्त केला विश्वास

गोवा विद्यापीठ (Goa University) 8 ते 25 मार्च दरम्यान प्रवेशासाठी त्यांच्या पोर्टलवर अर्ज स्वीकारेल आणि 11 ते 13 एप्रिल दरम्यान मुलाखती घेतल्या जातील. ऑफर असलेल्या विविध जागांपैकी NIO मध्ये 50 जागा, गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 22 आणि गोवा संगीत महाविद्यालय येथे सहा जागा आहेत. "अर्जदार जास्तीत जास्त तीन ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहेत," अशी माहिती विद्यापीठाने दिली.

मार्च 2022 सत्रासाठी पीएचडी प्रोग्राममध्ये ज्यांनी विविध भारतीयांच्या CSIR-UGC/UGC NET JRF/लेक्चरशिप, SET/SLET/JEST/ICAR-NET परीक्षा यासारख्या सर्वोच्च संस्थांच्या परीक्षांमध्ये पात्रता प्राप्त केली आहे. तसेच वैध प्रमाणपत्रासह राज्ये/ गेट, डीएसटी इन्स्पायर फेलोशिप असलेले किंवा यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एमफिल पदवी प्रदान केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेश खुला असणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी (Student) दूरस्थ पद्धतीने एमफिल पूर्ण केले आहे ते प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. डिसेंबर 2020 आणि ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या गोवा विद्यापीठात पीएचडी प्रवेश परीक्षेत (GU-PET) पात्र झालेले सर्व लोक डॉक्टरेट प्रोग्रामच्या जागांसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात, असे विद्यापीठाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com