Sancoale Panch Arrested: 'मंत्र्यांच्या फोननंतर आपल्‍याला अटक '; सांकवाळ पंचांचा खळबळजनक दावा, 'नाईक'प्रकरणी न्‍यायालयाने मागितले स्‍पष्‍टीकरण

Tulsidas Naik Arrest: भूतानी प्रकल्‍पाला विरोध करणारे सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांना अटक करताना वेर्णा पोलिसांनी आगावू नोटीस देण्‍याची तसदी न घेतल्‍याने वास्‍को प्रथम वर्ग न्‍यायालयाने वेर्णा पोलिसांना धारेवर धरताना उद्या, ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत याचे स्‍पष्‍टीकरण न्‍यायालयाला द्या, अशी ताकीद पोलिसांना दिली आहे.
Sancoale Panch Arrested
Tulsidas Naik ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Sancoale Panch Tulsidas Naik Arrest Case For Opposing Bhutani Project

मडगाव: भूतानी प्रकल्‍पाला विरोध करणारे सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांना अटक करताना वेर्णा पोलिसांनी आगावू नोटीस देण्‍याची तसदी न घेतल्‍याने वास्‍को प्रथम वर्ग न्‍यायालयाने वेर्णा पोलिसांना धारेवर धरताना उद्या, ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत याचे स्‍पष्‍टीकरण न्‍यायालयाला द्या, अशी ताकीद पोलिसांना दिली आहे. हे स्‍पष्‍टीकरण न दिल्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाईल, असा स्‍पष्‍ट इशारा वास्‍कोचे प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहीर इसानी यांनी दिला आहे.

वेर्णा पोलिसांनी काल नाईक यांना अटक केली होती. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवला होता. काल सांकवाळ पंचायतीची मासिक बैठक सुरू असताना पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेऊन नंतर अटक केली होती.

वेर्णा पोलिसांनी काल भूतानी प्रकल्‍पाला विरोध करणारे सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांना अटक केली होती. काल सांकवाळ पंचायतीची मासिक बैठक चालू असताना पोलिसांनी त्‍यांना आपल्‍या ताब्‍यात घेऊन नंतर अटक केली होती. मात्र ही अटक करण्‍यापूर्वी फौजदारी आचारसंहितेच्‍या ४१ कलमाखाली गुन्‍ह्याची माहिती देणारी जी नोटीस जारी करणे आवश्‍‍यक होते, ती दिली नव्‍हती.

याच मुद्यावर काल रात्री उशिरा न्‍या. इरानी यांनी नाईक यांची १० हजार रुपयांच्‍या जामिनावर मुक्‍तता करताना पोलिसांनी ही अटक करताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने घालून दिलेली निर्देशक तत्‍वे का अमलात आणली नाहीत, असा सवाल केला होता. दरम्‍यान, आपल्‍याला झालेली ही अटक बेकायदेशीर असून एका मंत्र्यांच्‍या दबावाखाली पोलिसांनी आपल्‍याला विनाकारण अटक केली, असा आरोप नाईक यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना केला.

Sancoale Panch Arrested
Advalpal: ..आमचे 'गाव' वाचवा! 'खाण' विषयावरुन अडवलपालवासीयांचा आक्रोश; सरकारी नोटिसांमुळे वाढली खळबळ

नेमके काय घडले?

नाईक म्‍हणाले, काल पंचायतीची बैठक होती. ही बैठक उपसरपंचांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली होती. यावेळी आपण मागच्‍या बैठकीतील इतिवृत्त वाचून दाखवा, अशी मागणी केल्‍यानंतर या पंचायतीत सचिव म्‍हणून काम करणाऱ्या आवरिलो वालिस यांनी नकार दिला. उपसरपंचांकडे ही मागणी केल्‍यावर त्‍यांनीही त्‍यासाठी नकार दिला.

आम्‍ही मागणी लावून धरल्‍यानंतर त्‍यांनी बैठक मध्‍येच सोडून ते आम्‍ही पोलिसांत तक्रार करतो, असे सांगून उठून गेले. त्‍यानंतर तासाभराने पोलिस पंचायत कार्यालयात आले. त्‍यांनी मला जबरदस्‍तीने जीपमध्‍ये बसवून वेर्णा स्‍थानकावर नेले. तिथे माझ्‍यावर काय आरोप आहेत, याची कुठलीही कल्‍पना न देता आपला जबरदस्‍तीने जबानी घेतली आणि नंतर आपल्‍याला अटक केली.

Sancoale Panch Arrested
Cash For Job Scam: ''गोवा आता घोटाळ्याची भूमी म्हणून देशभर नावारुपास आलाय'', कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन पालेकर बरसले

कोणत्‍याही मालमत्तेची हानी केलेली नाही

नाईक हे भाजपच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा समितीचे अध्‍यक्ष आहेत. आपल्‍या अटकेचा निषेध करताना ते म्‍हणाले, आपण लोकांची बाजू मांडण्‍यासाठी पंचायतीत प्रयत्‍न करत होतो. आपल्‍याबरोबर त्‍यावेळी पंचायत कार्यालयात अन्‍य नागरिकही उपस्‍थित होते. आपण कुठल्‍याही मालमत्तेची हानी केलेली नाही. तरीही एका मंत्र्याने पोलिसांना फोन केल्‍यानंतर त्‍यांनी आपल्‍याला अटक केली. या राजकारण्‍याचा भूतानी प्रकल्‍पाला पाठिंबा असून त्‍यामुळेच आपल्‍यावर दबाव आणण्‍यासाठी हा प्रकार केला, असा आरोप त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com