Goa Comunidade: सेरुला कोमुनिदादची जमीन हडपप्रकरणी परुळेकरांवर गुन्हा नोंदवण्‍याचा आदेश

Trojan D'mello: पोलिस चौकशीसह या एकंदरीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी
Trojan D'mello: पोलिस चौकशीसह या एकंदरीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी
Trojan D'melloDainik Gomantak
Published on
Updated on

सेरुला कोमुनिदादची जमीन हडपप्रकरणी तत्कालीन पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व इतरांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश सत्र न्यायालयाने पर्वरी पोलिसांना दिला आहे. आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ट्रोजन डिमेलो यांनी ही माहिती दिली.

पोलिस चौकशीसह या एकंदरीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी डिमेलो यांनी केली. या जमीन हडपप्रकरणी १८ ऑक्टोबर २०१४ रोजी, पर्वरी पोलिसांत मी तक्रार दाखल केली होती.

तत्कालीन पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, कामुनिदादचे अ‍ॅटर्नी पीटर मार्टिन्स, प्रमोद परुळेकर, उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक आयरिन सिक्वेरा व सेरुला कोमुनिदादचे पदाधिकारी यांनी संगनमताने व बेकायदेशीररित्या आपल्या फायद्यासाठी सेरुला कोमुनिदादची जमीन हडप केल्यामुळे त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ११९, १२०, ४१८, १२० (ब) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) (क) (ड) याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी आपल्‍या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

या आदेशाला पोलिसांच्या वतीने सरकारने सत्र न्यायालयात आदेश पुनर्विचार याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाला पुन्‍हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. या आदेशाबाबतीत आमचा पुनर्विचार अर्ज न्यायालयाने फेटाळला. तत्पूर्वी परुळेकर व इतरांनी प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Trojan D'mello: पोलिस चौकशीसह या एकंदरीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी
Goa Comunidade: माजी ॲटर्नी परेरांवर एफआयआर नोंदवा

अवमान याचिका दाखल करणार

बेकायदेशीर मिळविलेली जमीन परत कोमुनिदादला द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलीप परुळेकर यांना पुनर्विचार याचिका निकाली काढताना दिले होते. या आदेशासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पण ही जमीन अद्याप परत करण्यात आलेली नाही. अजून सदर जागेवर दुकाने उभी आहेत. ही जागा पूर्वपदी आणण्यासाठी सरकार काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले.

पोलिस सर्वसामान्य लोकांवर लगेच गुन्हा नोंदवतात. मात्र राजकीय आणि बलाढ्य व्यक्तींविरोधात ते गुन्हा नोंदवत नाहीत. मी माझ्या तक्रारीचा सतत पाठपुरावा केल्यामुळे आठ वर्षे आठ महिने सहा दिवसांनी न्याय मिळाला. निकालाला उशीर झाला तरी न्याय मिळतोच. कायद्याचे हात लांब असतात.

ट्रोजन डिमेलो, समाजकार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com