पंचनाम्यातील त्रुटी ड्रग्स पेडलरच्या पथ्यावर!

संशयित निर्दोष : एनडीपीएस न्यायालयाचे पोलिसांच्या तपासकामावर ताशेरे
Court
CourtDainik Gomantak

पणजी: ड्रग्जप्रकरणी गुन्हा दाखल करताना संशयिताच्या नावामध्ये केलेली चूक तसेच जप्त केलेला ड्रग्ज संशयिताच्या घरात सापडल्याची साक्ष देण्यास साक्षीदाराने दिलेला नकार यामुळे सत्र न्यायालयाने नायजेरियन संशयित युगोचुकू डुके ओगबोक याला निर्दोष ठरविले. पोलिसांनी पंचनाम्यात केलेल्या त्रुटीबाबत तपासकामावर (एनडीपीएस) न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

(Court of Session acquitted Nigerian drug suspect Yugochukwu Duke Ogbok)

Court
Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी?

हणजूण पोलिसांनी 30 एप्रिल 2015 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झरिवाडा - हणजूण येथील एका नायजेरियन नागरिकाला 3.010 किलो चरस, 5.4 ग्रॅमचे 505 एलएसडी पेपर्स, 113 ग्रॅम एमएमडीए, 42.5ग्रॅम कोकेन, 6.5 ग्रॅमच्या 20 एक्स्टसी गोळ्या हा ड्रग्ज जप्त केला होता व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खटल्यावर न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांनी पंचनाम्यावेळी सादर केलेल्या दोन साक्षीदारांपैकी एकाने साक्ष देण्यास नकार दिला तर दुसऱ्याने पोलिसांनी पंचनाम्यात नमूद केलेली माहिती व त्याने न्यायालयात दिलेल्या साक्षीत विसंगती आढळून आली. पोलिसांनी ही कारवाई करताना संशयिताला ड्रग्जसह त्याच्या घरात पकडल्याचा पुरावा सिद्ध करू शकलेले नाही असे निरीक्षण करत संशयिताला पुराव्याअभावी निर्दोष ठरवले.

मैत्रिणीकडून बचाव साक्ष

हणजूण पोलिसांनी 30 एप्रिल 2015 रोजी छापा टाकून कारवाई केल्याचे दाखवत असले तरी संशयितासोबत राहत असलेल्या त्याच्या मैत्रिणीने दिलेल्या बचाव साक्षीवेळी हे पोलिस 27 एप्रिल 2015 रोजी रात्रीच्यावेळी घरी आले होते. त्यावेळी संशयित व मी होते. छापा मारण्यासाठी त्यांच्याकडे कसलेही शोध वॉरंट नव्हते तसेच सोबत महिला पोलिसही नव्हते. जबरदस्तीने पोलिसांनी शोध सुरू केला मात्र त्यांना काहीच सापडले नाही. त्यानंतर चार दिवसांनी ही कारवाईची बनवेगिरी केली.

Court
Mumbai Police‘वॉन्टेड’ विकी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द

साक्षीदार म्हणतो...

साक्षीदार सुनील कोरगावकर याने न्यायालयात साक्ष देताना ड्रग्जचे वजन किती होते, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या पाकिटावर किती सील होते, पासपोर्ट जप्त केला होता का, ड्रग्ज पाकिटावर इतर साक्षीदाराने सही केली होती का याबाबत माहिती नाही अशी उत्तरे दिली होती. त्यामुळे पोलिसांनी केलेली ही कारवाई बनवेगिरी असल्याचा युक्तिवाद संशयिताच्या वकिलांनी केला होता.

विदेशी असूनही भारतीय : पोलिसांनी आरोपपत्रात संशयित विदेशी नागरिक असताना भारतीय नागरिक असे नमूद केले आहे. संशयिताच्या राहत असलेल्या घरात छापा टाकला त्यावेळी वाहन लॉगबुक माहिती पोलिसांनी सादर केली नाही. एका साक्षीदारने पंचनाम्याबाबत संशय व्‍यक्त करून साक्ष देण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com