Bronzeback Tree Snake: पश्चिम घाटात या सापाचे अस्तित्व आहे की नाही? गोव्यातील संस्थेच्या संशोधनातून मिळालं उत्तर

Western Ghats: आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या ''ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक'' अर्थातच रुका (नानाड्डो) या सापाच्या प्रजातीचे संपूर्ण पश्चिम घाटात अस्तित्व असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
Bronzeback Tree Snake, Western Ghat, Snakes In Marathi
Bronzeback Tree SnakeDAINIK GOMANTAK
Published on
Updated on

डिचोली: आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या ''ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक'' अर्थातच रुका (नानाड्डो) या सापाच्या प्रजातीचे संपूर्ण पश्चिम घाटात अस्तित्व असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. गोव्यातील ऍनिमल रेस्क्यू स्कॉडच्या सहकार्याने गुजरातमधील हर्पेटोलॉजिस्ट या संस्थेने केलेल्या संशोधनात या ''ब्रॉन्झबॅक'' सापाच्या अस्तित्वाबद्धलचे रहस्य दूर झाले असून या सापाच्या प्रजातीच्या मानांकनाची पूर्तताही झाली आहे.

ऍनिमल रेस्क्यू स्कॉडचे अध्यक्ष अमृतसिंग यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. सुमारे २०० वर्षांपूर्वी ''ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक'' या सापाचे अस्तित्व असल्याचे आढळून आले होते. ''डेंड्रेलाफिस चेअरेकाकोस'' असे या सापाचे वैज्ञानिक नाव आहे. हर्पेटोलॉजिस्ट दिकांश परमार आणि अमृत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या (Goa) पथकाने या सापाच्या प्रजातीच्या वेगळेपणाचे पुन्हा प्रमाणीकरण केले आहे. आशिया जैवविविधतेसंबंधीचा माहितीपर जर्नल असलेल्या ''टार्पोबॅनिका''च्या नोव्हेंबर २४ च्या आवृत्तीत ''ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक'' या सापाच्या सद्य स्थितीवरील संशोधन पेपर प्रकाशित झाला आहे, अशी माहिती अमृतसिंग यांनी दिली.

१८२७ साली प्रथम या सापाचा शोध लागला होता. मात्र या सापाच्या अस्तित्वाबाबत संशोधकांनी वेगवेगळे दावे केले होते. हा साप वैध प्रजाती नाही. केरळ किंवा दक्षिण भारतातच (South India) या सापाचे अस्तित्व आहे, असा संशोधकांचा दावा होता. मात्र आनुवंशिक पुरावा देण्यात आतापर्यंत यश आले नव्हते, असे अमृतसिंग यांनी सांगून या सापांच्या अस्तित्वाबद्धलचे रहस्य आता उलगडले आहे, असा दावा केला.

अस्तित्वावर संकट

''ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक'' अर्थातच रुका (नानाड्डो) या सापाबद्धल अनेक गैरसमज असले तरी हा साप बिनविषारी व निरुपद्रवी आहे. या सापांचे बहुतांशवेळी झाडांवर वास्तव्य असते. पाली, सरडे, बेडूक आणि लहान पक्षी हे या सापांचे भक्ष्य आहे, अशी माहिती अमृतसिंग यांनी देऊन विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षसंहारामुळे या सापांच्या अस्तित्वावर संकट आले आहे, अशी खंत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेवेळी स्कॉडचे सचिव सुनील पळ आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com