Cotigao: विश्रांतीगृह नाही चेकनाक्याचा संशय! खोतीगावातील बांधकाम थांबवा; माजी सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Cotigao Pimpalamal forest construction: २३ फेब्रुवारीला लोकांनी एकत्रित येऊन हे काम बंद करण्यास भाग पाडले होते.
Cotigao forest land construction stopped by locals
Cotigao forest landDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: पिंपळामळ-खोतीगांव येथे वन खात्याने चालविलेले बांधकाम त्वरित बंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन खोतीगावचे माजी सरपंच उमेश ऊर्फ दया गावकर यांनी उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांना सादर केले आहे.

गावकर यांनी या निवेदनात म्हटले आहे की, या बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध आहे. २३ फेब्रुवारीला लोकांनी एकत्रित येऊन हे काम बंद करण्यास भाग पाडले होते. परंतु विरोध असतानाही २१ मार्चपासून या बांधकामाला पुन्हा सुरवात केली आहे.

Cotigao forest land construction stopped by locals
Yeda Cotigao: वनजमिनीतील खोदकामावरुन येडा-खोतीगावचे रहिवासी आक्रमक! सभापतींकडून काम न करण्याची सूचना

या ठिकाणी विश्रांती गृह उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी चेकनाका उभारण्यात येत असल्याचा स्थानिकांना संशय आहे. या ठिकाणी चेकनाका उभारल्यास ग्रामस्थांसाठी अडचणीचे ठरणार असून स्थानिकांची सतावणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे बांधकाम रोखावे, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.

Cotigao forest land construction stopped by locals
Cotigao: दक्षिण गोव्यातील खोतिगावचा देशात डंका; उत्कृष्ट पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

खोतीगाव अभयारण्य कक्षेत पिंपळामळ, येडा-खोतीगाव येथे वनजमिनीत सुरू असलेले बांधकाम रहिवाशांनी विरोध करून बंद पाडले होते . त्यानंतर सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी घटनास्थळी येऊन जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेले खोदकाम बंद करण्याची सूचना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com