Yeda Cotigao: वनजमिनीतील खोदकामावरुन येडा-खोतीगावचे रहिवासी आक्रमक! सभापतींकडून काम न करण्याची सूचना

Yeda Cotigao Construction Issue: खोतीगाव अभयारण्य कक्षेत पिंपळामळ, येडा-खोतीगाव येथे वनजमिनीत सुरू असलेले बांधकाम येथील रहिवाशांनी विरोध करून बंद पाडले.
 Yeda Cotigao forest land construction stopped by locals
Yeda Cotigao forest landDainik Gomantak
Published on
Updated on

Yeda Cotigao forest land construction stopped by locals

काणकोण: खोतीगाव अभयारण्य कक्षेत पिंपळामळ, येडा-खोतीगाव येथे वनजमिनीत सुरू असलेले बांधकाम येथील रहिवाशांनी विरोध करून बंद पाडले. त्यानंतर सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी घटनास्थळी येऊन जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेले खोदकाम बंद करण्याची सूचना केली.

येडा-खोतीगाव येथे वन खात्याच्या मालकीच्या जमिनीत पेट्रोलिंग स्टेशन उभारण्यासाठी रविवारी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर व अन्य रहिवाशांनी खोदकाम सुरू असलेल्या जागी येऊन ते बंद करण्याची मागणी केली.

त्याचप्रमाणे सरपंचांना फोन केला. मात्र, शेवटपर्यंत सरपंच घटनास्थळी आलेच नाहीत. यासंदर्भात उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी खोतीगाव पंचायतीची ग्रामसभा सुरू होती. या घटनेचे पडसाद ग्रामसभेतही उमटले.

नडके-खोतीगाव येथे अशाच प्रकारे पेट्रोलिंग स्टेशन उभारण्याचा बहाणा करून वन खात्याने मागाहून त्या ठिकाणी चेक पोस्ट उभारला व गेट घातली. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेट घातल्याने कोणी आजारी असल्यास त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हत्तीपावल येथे येऊन चावी घेऊन गेट उघडावी लागत आहे. त्यामुळे या कामाला विरोध करण्यात येत असल्याचे माजी सरपंच दया गावकर यांनी सांगितले.

गावकर यांनी या विषयावर ग्रामसभेत आवाज उठविला. सरपंचांना पाचवेळा फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली. तरीही त्या आल्या नसल्याने नागरिकांना कायदा हातात घेऊन काम बंद करावे लागले, असे गावकर यांनी सरपंचांना ग्रामसभेत सुनावले.

 Yeda Cotigao forest land construction stopped by locals
St Inez: सांतिनेजमधील ‘ते’ बांधकाम अखेर उद्ध्वस्त! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि अर्ध्या तासात कारवाई

नागरिकांना विश्वासात घ्यावे!

पंचायत व नागरिकांना विश्वासात घेऊनच वन खात्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी हे खोदकाम बंद पाडले आहे. त्याचप्रमाणे हा विषय ग्रामसभेतही आला. त्यासंदर्भात सरपंचांनी वन खात्याला कळवावे, अशी सूचना सरपंचांना केली आहे. वन खात्याने काम पुढे सुरू करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घ्यावे, तोपर्यंत हे काम बंद करण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.

 Yeda Cotigao forest land construction stopped by locals
Cotigao: दक्षिण गोव्यातील खोतिगावचा देशात डंका; उत्कृष्ट पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

पेट्रोलिंग स्टेशनसाठी खोदकाम

येडा येथे वन खात्याची जमीन दरवर्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. या आगप्रवण क्षेत्रात चोवीस तास टेहळणी करण्यासाठी या ठिकाणी पेट्रोलिंग स्टेशन उभारण्याची शिफारस वन खात्याने केली होती. सर्व सोपस्कार करून या पेट्रोलिंग स्टेशनची उभारणी करण्यासाठी खोदकाम करण्यात येत होते. मात्र, येथील काही रहिवाशांनी त्याला आडकाठी आणली असल्याचे खोतीगाव अभयारण्याचे क्षेत्रीय वनाधिकारी आनंद मेस्त्री यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com