Cotigao: मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला बिबट्या, अंधारामुळे पडला विहिरीत; वनखात्याचे अथक प्रयत्न यशस्वी

Cotigao leopard rescue: भक्ष्याच्या शोधात मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी पहाटे रेंज वन अधिकारी आनंद वेळीप आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली वाचवण्यात आले.
Cotigao leopard rescue
Cotigao leopard rescueDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: वन्यजीव व मानव जातीचे संघर्षपूर्ण जीवनातील अनेक किस्से अधूनमधून ऐकायला मिळत आहेत. अशीच एक घटना सोमवार, ३० रोजी पहाटे खोतिगाव येथील पणसुलेमळ या ठिकाणी घडली.

भक्ष्याच्या शोधात मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी पहाटे रेंज वन अधिकारी आनंद वेळीप आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली वाचवण्यात आले. वन विभागाचे हंगामी कर्मचारी असलेले राजेश वेळीप यांच्या मालकीच्या पणसुलेमळ येथील खोल विहिरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Cotigao leopard rescue
VIDEO: पोर्तावाडा-शिवोलीत बिबट्याचे दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वनअधिकारी आनंद वेळीप यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने तत्परतेने आणि यशस्वीपणे दोऱ्यांचा वापर करून थकलेल्या बिबट्याला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप विहिरीबाहेर काढले व मानव वन्यजीव संघर्ष तपासणीनंतर त्या बिबट्याला पुढील निरीक्षणाखाली ठेवले आहे.

Cotigao leopard rescue
Tiger: वाघ पाहणे म्हणजे केवळ 'वाघाचे दर्शन' घेणे नसते, तर जंगल पाहणे असते; जीवनानुभव

मागाहून त्याला बोंडला वन्यजीव संरक्षण केंद्रात पाठवून देण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेतून मानव व वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी वन विभागाचे सुरू असलेले प्रयत्न अधोरेखित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com