Cortalim landslide road repair
Cortalim highway projectDainik Gomantak

Cortalim: कुठ्ठाळीतील संरक्षक भिंतीचे काम सुरू, आमदार वाझ यांच्या हस्ते शुभारंभ; 45 दिवस रस्ता राहणार बंद

Cortalim Junction Road: दरड कोसळून पडलेल्या ठिकाण चे प्रत्यक्ष काम आणखी दोन दिवसांनी सुरू होणार असून हा मार्ग येत्या सुमारे ४५ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे.
Published on

Cortalim Junction Road

कुठ्ठाळी: राष्ट्रीय महामार्ग कुठ्ठाळी जंक्शनकडून कुठ्ठाळी-मडकई फेरी धक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोसळलेल्या दरडीचे ठिकाणच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी सकाळी आमदार आंतोन वाझ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी कुठ्ठाळीच्या सरपंच उज्ज्वला नाईक, पंच फ्रान्सिस फर्नांडिस, मानुयल सिल्वा, मेल्वीन वाझ, तसेच एडवर्ड फर्नांडिस तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.

या दरड कोसळून पडलेल्या ठिकाण चे प्रत्यक्ष काम आणखी दोन दिवसांनी सुरू होणार असून हा मार्ग येत्या सुमारे ४५ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. हे गोवा सरकारकडून केंद्रीय भूपृष्ठ महामार्ग मंत्रालयाकडून होणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी बावीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा कामाचा कंत्राट पर्वरी येथील रीस कंस्ट्रक्शन यांना मिळाला आहे.

Cortalim landslide road repair
Cortalim: कोन्सुआतील कचरा प्रकरणाची फाईल गायब! कुठ्ठाळी पंचायत करणार पोलिस तक्रार दाखल

यावेळी आमदार आंतोन वाझ म्हणाले की, हे काम योग्य सोपस्कार पूर्ण करून करण्यात आले आहे. यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे मनापासून आभार मानतो.

हे काम लोकांच्या हितासाठीच रीतसर बेंच मार्किंग करून करण्यात येणार असून यासाठी वेळ लागणार असल्याने वाहतूक वळविण्यात येणार आहे. जनतेने सहकार्य करून हे काम त्वरित पूर्ण करण्यास मदत करावी, असे ते म्हणाले.

Cortalim landslide road repair
Cortalim: दोन दोन बस शेड, तरीही प्रवासी उन्हात! कुठ्ठाळीतील विचित्र प्रकार; रस्त्यावरच करावी लागते प्रतीक्षा

सरपंच उज्ज्वला नाईक यांनी आमदार आंतोन वाझ यांचे आभार मानून लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पंच मेल्वीन वाझ व एडवर्ड फर्नांडिस यांनी आमदार वाझ यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले.

ही दरड गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळून सुमारे तीन दोनचाकी मातीच्या ढिगाऱ्यात गाडल्या गेल्या होत्या. पावसाळी अधिवेशनातून थेट येऊन आमदार आंतोन वाझ यांनी यासाठी प्रयत्न केले होते व बचाव काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com