Cortalim: कोन्सुआतील कचरा प्रकरणाची फाईल गायब! कुठ्ठाळी पंचायत करणार पोलिस तक्रार दाखल

Cortalim Missing file Case: राष्ट्रीय महामार्ग ब्लू बॅरी समोरील सर्वे क्रमांक १२८/१ या कोमुनिदादच्या जमिनीत टॉमी कारवालो नामक व्यक्तीने वास्कोतील शिपयार्डमधून घातक टाकाऊ कचरा आणून येथे टाकला होता.
Cortalim Missing file Case
Cortalim Waste Missing file CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी: नुकत्याच झालेल्या कुठ्ठाळीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ जॉयल फर्नांडिस यांनी आपण उपस्थित केलेल्या प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण मागितले असता संबंधित प्रकरणाशी संबंधित फाइल पंचायत कार्यालयातून गायब झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. सभा सुरू असताना सरपंच व सचिवांनी कर्मचाऱ्यांना फाइल शोधायला लावली पण सापडली नाही. दरम्यान, याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग ब्लू बॅरी समोरील सर्वे क्रमांक १२८/१ या कोमुनिदादच्या जमिनीत टॉमी कारवालो नामक व्यक्तीने वास्कोतील शिपयार्डमधून घातक टाकाऊ कचरा आणून येथे टाकला होता. याची व्याप्ती १२० मिटर लांबी तर १८ मिटर रुंदी एवढ्या परिसरात होती. त्यामुळे जॉन फिलिप परेरा यांनी याबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्षांना तक्रार दाखल केली.

Cortalim Missing file Case
Bainguinim Waste Plant: 'हिंमत असेल तर प्रकल्प उभारुन दाखवाच'; बायंगिणीतील कचरा प्रकल्पावरुन मोन्सेरात-फळदेसाई पुन्हा आमने-सामने

त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने १/७/२०२१ मध्ये कुठ्ठाळी पंचायत सचिवांना आदेशवजा पत्र पाठवून कचरा टाकणाऱ्यांकडून संबंधित घातक टाकाऊ कचरा हटवावा तसेच जमीन पूर्ववत करावी व झालेला खर्च वसूल करावा, असे निर्देश दिले होते. पंचायत सचिवांनी संबंधित कचरा टाकणारे टॉमी कारवालो यांना नोटीस पाठवून तो कचरा हटविण्याची ताकीद दिली होती.

Cortalim Missing file Case
Bainguinim Waste Plant: "कचरा प्रकल्पाला विरोध नाही; लोकांच्या भावनांचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल" भाऊंचे आश्वासन

पण आजपर्यंत तो कचरा तेथून हटवला गेला नाही. सध्या याबाबत कुठ्ठाळी पंचायतीनेही हात वर काढल्याचे जाणवते तर दुसऱ्या बाजूने संबंधित प्रकरणातील फाइल सुद्धा गायब झालेली आहेत. याबाबतीत आता कुठ्ठाळीतील ग्रामस्थ पंचायत किंवा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com