Margaon Municipality : एका वर्षांत चार ठिकाणी नाहक बदली!

महिलेची सतावणूक ः मंगळवारी उपोषणाचा नगरसेवक कामिल बार्रेटो यांचा इशारा
Kamil Barreto
Kamil BarretoDainik Gomantak

Corporator Kamil Barreto : मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी नागरी पुरवठा खात्यात एका ५५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याची कशी सतावणूक सुरू आहे, याबाबत पत्रकारांना माहिती दिली. एका वर्षात तिची चारकडे बदली करण्यात आली आहे. प्रथम मडगवात सिव्हील फोरमच्या कचेरीत. तिथून दीड महिन्यांनी तिला केपेत. नंतर चार महिन्यांनी पणजी व आता सहा महिन्यानी तिची वाळपई येथे बदली करण्यात आली आहे.

तिला मंगळवारपर्यंत वाळपई इथे हजर राहण्यास सांगितले हे, असे बार्रेटो यांनी सांगितले. नागरी पुरवठा खात्यात घोटाळा झाला होता, त्यात सामिल होण्यास या महिला कर्मचाऱ्याने, जी नागरी पुरवठा निरीक्षक दोन म्हणून काम पाहते, नकार दिल्यामुळे तिची सतावणूक चालू असल्याचे बार्रेटोने म्हणाले.

Kamil Barreto
Madgaon Garbage : कचऱ्यामुळे त्रस्त माडेलवासीयांची निदर्शने; मडगाव पालिका कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप

वाळपई येथे बदली झाल्याने तिला निवृत्त व्हायला केवळ पाच वर्षे बाकी आहेत, अशा बाईला दररोज ६० अधिक ६० एकूण १२० कि.मी. प्रवास करायला खाते भाग पाडत आहे. मध्यंतरी या प्रकरणी नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांना भेटायला गेले, असता कळले की ते केवळ शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंतच लोकांना भेटतात.

Kamil Barreto
Madgaon : कुंकळ्‍ळी युनायटेड हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट क्लास रुम’ची सुविधा उपलब्ध

त्यानंतर त्यांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आऊट ऑफ रेंज असा निरोप येऊ लागला, असेही कामिल बार्रेटो याने सांगितले.जर उद्या म्हणजे सोमवारपर्यंत तिचा बदली आदेश रद्द करण्यात आला नाही, तर मंगळवारी आपण विधानसभेबाहेर भर पावसात उपोषणास बसणार असल्याचे बार्रेटो यांनी जाहीर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com