Goa Corona Update: भय इथले संपत नाही!

कोरोनाची तिसरी लाट ओसरली; पण चौथ्या लाटेचे संकेत
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

अनिल पाटील

 पणजी:  राज्यातील ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियंटची तिसरी लाट आता संपल्यात जमा असली तरी  जूनच्या दरम्यान डेल्टा मायक्रॉन या नव्या व्हेरियंटची चौथी लाट  येण्याची शक्यता आहे. सध्या युरोप, आफ्रिका आणि चीनमध्ये या चौथ्या लाटेच्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत असून याचा संसर्ग आणि संक्रमणाचा वेग जास्त आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसा इशाराही केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यात गेला आठवडाभर नवे बाधित सापडत असले तरी  11 मार्चपासून मृत्यूचे प्रमाण शून्य झाले आहे. शिवाय उपचारासाठी रुग्णालयात कोणीही भरती झालेले नाही. यावरून तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव संपल्यात जमा आहे. मात्र, चौथ्या लाटेची भीती कायम आहे; कारण जगभरातल्या अनेक खंडांमध्ये याचा संसर्ग वाढत आहे.

Goa Corona Updates
बहुसंख्य सदस्यांची प्रमोद सावंत यांनाच पसंती

तिसऱ्या लाटेची सुरुवात डिसेंबरच्या शेवटी झाली. शेवटच्या आठवड्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडू लागले. 12 ते 23 जानेवारीदरम्यान तिसऱ्या लाटेने अत्युच्च टोक गाठले. 19 जानेवारीला 10,153 संशयित रुग्णांच्या चाचण्या केला असता सर्वाधिक 3,936 नवे रुग्ण सापडले. 18 जानेवारीला 5,508 संशयितांच्या चाचण्या केल्या असता 2,523 म्हणजे 45.79 टक्के रुग्ण सापडले. 16 जानेवारीला हा रेट 45.85 इतका होता. तिसऱ्या लाटेतील त्या दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक होता. 28 जानेवारीला सर्वाधिक 20 रुग्णांचे मृत्यू झाले, तर 25 जानेवारीला सर्वाधिक 108 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. 22 ते 30 जानेवारीदरम्यान विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण भरती होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते.

Goa Corona Updates
प्रतापसिंग राणेंच्या आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा निर्णय 24 तासात

केंद्र सरकारकडून सूचना

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हवे पंचसूत्रीचे पालन सर्वच राज्यांनी जिनोम सिक्वेन्सिंगवरही भर द्यावा नव्याने तयार होणाऱ्या ‘क्लस्टर’वर लक्ष ठेवावे ‘आयसीएमआर’च्या नियमांप्रमाणे चाचण्या हव्या पात्र नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी

देशात नवा व्हेरियंट किंवा विषाणू म्युटेशन झाले तर कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस दिली असल्याने नव्या व्हेरियंटचा त्रास होणार नाही.

- डॉ. शेखर साळकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com