Cordelia Cruise at Goa: हंगामातील पहिले क्रुझ जहाज गोव्यात दाखल; कॉर्डेलिया क्रुझचे मुरगाव बंदरात स्वागत

एमपीए च्या कर्मचाऱ्यांनी केले प्रवाशांचे स्वागत
Cordelia Cruise at Goa
Cordelia Cruise at GoaDainik Gomantak

Cordelia Cruise at Goa: गोव्यात यंदाच्या हंगामातील पहिले क्रुझ जहाज दाखल झाले आहे. एमव्ही एम्प्रेस हे क्रुझ जहाज गोव्यातील मुरगाव बंदरात दाखल झाले. हे जहाज लक्षद्वीपमधील अगाट्टी बंदरातून मुरगावला आले. गोव्यात आलेले हे यंदाच्या हंगामातील पहिले देशांतर्गत क्रुझ जहाज आहे.

Cordelia Cruise at Goa
Luizinho Faleiro: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला गोवा महाराष्ट्रात विलिन करायचा होता; लुईझिन फालेरो यांचे वक्तव्य

या जहाजावर एकूण 218 प्रवासी आणि 572 कर्मचारी होते. आणखी 53 प्रवासी क्रूझमध्ये सामील झाले आणि 4 प्रवासी खाली उतरले. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास हे क्रुझ जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले.

या जहाजातील प्रवाशांचे मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. बंदराच्या प्रवेशद्वारावर त्यांना पुष्प अर्पण करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या चतुर्थी उत्सवामुळे कलाकार व्यस्त असल्याने हंगामातील या पहिल्या जहाजाचे भव्य स्वागत करता आले नाही.

अभ्यागतांच्या सहलीची सर्व व्यवस्था शिपिंग एजंट आणि एमपीए यांनी केली होती. यातील प्रवाशांना गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी टॅक्सी सेवा पुरविण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com