Old House Reconstruction: जुन्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी मोठा दिलासा; रुपांतरण सनद सवलतीचे नियम शिथिल, महसूल खात्याची अधिसूचना जारी

conversion sanad exemption old houses goa: जुन्या घरांची पुनर्बांधणी करणाऱ्या मालकांना रूपांतरण सनद सवलत देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शिथिल करण्‍यात आली आहे. महसूल खात्‍याने त्‍याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
conversion sanad exemption old houses goa
Old House ReconstructionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: जुन्या घरांची पुनर्बांधणी करणाऱ्या मालकांना रूपांतरण सनद सवलत देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शिथिल करण्‍यात आली आहे. महसूल खात्‍याने त्‍याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अस्तित्वात असलेली वास्तू फॉर्म एक आणि चौदामध्ये नोंदवलेली आहे. परंतु ती सर्वेक्षण नकाशात नाही, या कारणास्तव अर्जदारांना यापुढे सवलत नाकारली जाणार नाही.

अशा प्रकरणांमध्ये उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ) मूळ सर्वेक्षण नोंदी, फॉर्म दोन (गुणाकर पुस्तक), फॉर्म तीन (जमिनीची अनुक्रमणिका) आणि गट बुक वापरून वास्तूच्या अस्तित्वाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या नोंदींवरून १९७०-१९७२ च्या सर्वेक्षण कालावधीत वास्तू अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले, तर इतर पात्रतेच्या अटींच्या अधीन राहून सवलत दिली जाऊ शकते, असे अधिसूचनेत म्‍हटले आहे.

conversion sanad exemption old houses goa
CM Pramod Sawant Meeting: समन्वयातून राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्देश

दरम्‍यान, सेटलमेंट झोनमध्ये जुन्या वास्तूंनी भूखंडाच्या किमान २५ टक्‍के क्षेत्र व्यापलेले असेल, तेथेही ही सवलत लागू होईल. त्‍यासाठी अर्जदारांना दहा रुपये प्रक्रिया शुल्क आणि सूट प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपये भरावे लागतील, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.