कुंकळळी: कुंकळ्ळीच्या शूर वीरांनी 439 वर्षापूर्वी स्वराज्य व स्वधर्मासाठी दिलेल्या लढ्यामुळेच राज्यात धर्मांतराला लगाम बसला, कुंकळ्ळीच्या सोळा महानायकांच्या आहुतीने पावन झालेल्या आशिया खंडातील पहिल्या लढ्याचे स्मरण राज्य पातळीवर राज्य सरकारतर्फे करण्याचे भाग्य लाभले असून 15 जुलै हा दिवस कुंकळ्ळी हुतात्मा दिवस म्हणून दरवर्षी सरकार तर्फे साजरा केला जाणार आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळळी येथे सोळा महानायकांना आदरांजली वाहताना केले.
(439 years ago, the fight by the brave warriors of Cuncolim curbed conversion in the state - CM Sawant )
या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार युरी आलेमाव, आमदार उल्हास तुयेकर, पोलिस महासचालक जसपाल सिंग,नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक, चिफ्टन्स ट्रस्ट चे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स जिल्हाधिकारी ज्योती कुमारी , प्रोटोकॉल खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स, संजीव गडकर , मुख्याधिकारी शर्मिला गावकर ,सरकारी अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,की या पुढे गोव्यात धर्मांतरणाचे गैरप्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी आपले सरकार घेणार असून जसा आमच्या पूर्वजांनी बलाढ्य पोर्तुगीजांचे मिशन यशस्वी होऊ दिले नाही, तसेच आपले सरकार धर्मांतराला लगाम घालण्यास कटिबद्ध आहे. चिफ्टन्स स्मारकाचा उद्धार करणे , कुंकळळी उठावावर चित्रपट काढणे व कुंकळळी लढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यास आपले सरकार वचनबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा पोलिस परेड व पोलिस बॅंडने महानायकाना मानवंदना दिली. कुंकळ्ळीचा 15८3 चा लढा आशिया खंडातील प्रथम लढा म्हणून लढ्याला राज्यमान्यता मिळाली असून हा इतिहास पाठयपुस्तकात समाविष्ट करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले,की कुंकळ्ळी हुतात्मा स्मारकाला भव्य स्वरूप द्यावे व कुंकळळी आयडीसीतील प्रदूषणावरही लगाम घालावा. विदेश देसाई यांनी स्वागत केले, विजयकुमार कोप्रे यांनी सूत्रसंचालन केले. नीरज आगीयार यांनी आभार मानले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांनी सांगितले, की कुंकळळी ही वीरांची भूमी असून या भूमीतील वीरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता जुलमी पोर्तुगीजांना कडवे आव्हान दिले.कुंकळळीच्या इतिहासावर व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती होण्याची गरज असून मुख्यमंत्र्यांनी कुंकळळीच्या लढ्यावर व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी.
या वेळी विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या कुंकळळीतील काही ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.माजी मंत्री आरेसियो डिसोझा यांना कुंकळळी भूषण, माजी आमदार राजन नाईक यांना कुंकळळी श्री, आंतराष्ट्रीय फुटबॉल पटू फ्रेडी मास्कारेन्स व मिनींनी डायस यांना कुंकळळी ज्योती तर सेवा निवृत्त प्राचार्य टीलरॉय फेर्नाडीस यांना कुंकळळी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व वाणिज्य पदवी, बारावी व दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.