Domnic-Joan Case : धर्मांतर प्रकरणी जुआन-डॉमनिकविरुद्ध 8 गुन्हे दाखल

सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलार चर्चमध्ये धर्मांतर प्रकरणी जुआन मास्कारेन्हास डिसोझा आणि तिचा पती डॉमनिक डिसोझा यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात 8 गुन्हे नोंद आहेत.
Domnic-Joan Case : धर्मांतर प्रकरणी जुआन-डॉमनिकविरुद्ध 8 गुन्हे दाखल
Published on
Updated on

Domnic-Joan Case : सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलार चर्चमध्ये धर्मांतरण प्रकरणी जुआन मास्कारेन्हास डिसोझा आणि तिचा पती डॉमनिक डिसोझा यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात 8 गुन्हे नोंद आहेत. बिलिव्हर्सचे अनुयायी असलेल्या या जोडप्याने त्यांच्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना मारहाण केली.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे तेथील प्रार्थनेच्या बैठकीला बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे, असे उत्तर जिल्हाधिकारी मामू हागे यांनी खंडपीठाला दिले आहे.

सडये - शिवोलीत गेल्या दशकात अनेक घटना घडल्या, ज्यामुळे तेथील स्थानिक आणि बिलिव्हर्सच्या अनुयायांमध्ये भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत.

फाईव्ह पिलार चर्चमध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली आमिषे दाखवून धर्मांतर केले जाते. या दोघांची पार्श्‍वभूमी सांप्रदायिक असून चर्चमध्ये लोकांना बिलिव्हर्सचे प्रवचन देतात. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होते.

सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास तो लोकांच्या राष्ट्र व धार्मिक स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. पोलिस अधीक्षकांनी सडये-शिवोलीत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, या बिलिव्हर्सच्या प्रार्थनांवर बंदी आणण्याची विनंती केली आहे.

ही कारवाई करताना कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे याचिकादाराला कोणतीही अंतरिम मुभा देऊ नये, असे उत्तरात म्हटले आहे.

Domnic-Joan Case : धर्मांतर प्रकरणी जुआन-डॉमनिकविरुद्ध 8 गुन्हे दाखल
Goa Tourism: पर्यटन खात्यात ठाण मांडून बसलेल्या संचालकाची दमणला पाठवणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान

चर्च इमारतीमध्ये बैठका घेण्यास बंदी घातलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुआनने गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पास्टर डॉमनिक डिसोझा आणि त्याची पत्नी जोआन हे लोकांना आमिषे दाखवून धर्मांतर करत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या होत्या.

समाजातील विविध धर्मांमध्ये ते कलह निर्माण करत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाने त्यांची सशर्त जामिनावर सुटका केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठकांनाच बंदी घातल्याने डिसोझा दाम्पत्याने ही याचिका सादर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com