वादग्रस्त कार्डेलिया जहाज पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

जहाज 1125 प्रवाशांना घेऊन आज संध्याकाळी मुंबईला (Mumbai) रवाना झाले. आता सदर जहाज (Ship) शुक्रवारी 29 रोजी मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
मुरगाव बंदरात दाखल झालेले कोर्डेलिया जहाज.
मुरगाव बंदरात दाखल झालेले कोर्डेलिया जहाज. Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: अलीकडेच एका मोठ्या वादात अडकल्यानंतर, क्रूझ जहाज (Cruise ship) कार्डेलिया एम्प्रेस मुंबईहून गोव्यात आज 1105 प्रवासी व 631 कर्मचारी वर्ग घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले.तर संध्याकाळी 1125 प्रवाश्यासह मुंबईला रवाना झाले. कार्डेलिया क्रूजवर (Cordelia Cruise) अमली पदार्थ सापडल्याने ही क्रूझ एसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

कार्डेलिया पर्यटक जहाजात मुंबईत (Mumbai) अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच या छाप्यात बॉलीवूडच्या (Bollywood) अभिनेत्याचा मुलगा, उद्योजकाचे मुलगे व काही राजकीय संबंध असलेल्यांना अटक झाली होती.

मुरगाव बंदरात दाखल झालेले कोर्डेलिया जहाज.
जुन्या भाजपा कार्यकर्त्यांचे कोरगावात मिशन फॉर लोकल च्या बेनराखाली शक्ती प्रदर्शन

NCB च्या तपासात कार्डेलिया क्रूजवर (Cardelia Cruise) अमली पदार्थ सापडल्याने गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अश्यातच आता हे जहाज गोव्यात येणार की नाही याविषयी साशंकता असतानाच ही क्रुझ आता 1105 प्रवाशांना घेऊन गोव्यात दाखल झाली आहे. परतीच्या प्रवासात सुमारे 234 नवीन प्रवासी होते. 'शिपिंग एजन्सी जेएम बॅक्सीचे वरिष्ठ व्यवस्थापक (Administrator) गोविंद पेरनुलकर' यांनी सांगितले की, जहाज आता वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहील तसेच या हंगामात गोव्याला सुमारे 52 फेऱ्या असतील.

समुद्र पर्यटनाच्या मोसमाला 27 सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला होता. कोर्डेलिया हे प्रवाशी जहाज 1500 प्रवासी व 600 कर्मचाऱ्यांना घेऊन मुरगाव बंदरात झाले होते. 01 ऑक्टोबर 07 एप्रिल 2023 यामध्ये सदर जहाज 58 फेऱ्या गोव्यात मारणार होते.मात्र अलीकडेच एका मोठ्या वादात अडकल्यानंतर सदर जहाज गोव्यात आले नव्हते. आता त्याच्या 52 फेऱ्या मुरगाव बंदरात होणार आहे.

दरम्यान आज सकाळी कोर्डेलिया हे जहाज 1105 प्रवासी व 631 कर्मचाऱ्यांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले.यापैकी 234 प्रवासी मुरगाव बंदरात उतरले व ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गोव्यात राहिले. या व्यतिरीक्त 254 नवीन प्रवासी या जहाजावर चढून मुंबईला रवाना झाले. सदर जहाज 1125 प्रवाशांना घेऊन आज संध्याकाळी मुंबईला रवाना झाले. आता सदर जहाज शुक्रवारी 29 रोजी मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com