Panjim Smart City: सांतीनेज येथील शीतल हॉटेलजवळ खड्ड्यातून दुषित पाणी रस्त्यावर; चौकात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

वाहनधारक, पादचाऱ्यांच्या त्रासात भर; ‘स्मार्ट सिटी’च्या कामासाठीचा खड्डा
Panaji Smart City Work
Panaji Smart City WorkDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City Work: गोव्याची राजधानी पणजी येथे स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले आहे.

पणजीत जवळपास 7 वेळा वेगवेगळ्या रस्त्यांवर ट्रक रूतला होता. यापैकीच एक घटना सांतीनेज भागातील शीतल हॉटेलजवळ घडली होती. येथे ज्या ठिकाणी खड्ड्यात ट्रक रूतला होता त्या खड्ड्यातून गुरूवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत होते.

Panaji Smart City Work
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत इंधन दरांत घट, दक्षिण गोव्यात मात्र वाढ; जाणून घ्या आजचे दर...

त्यामुळे या चौकात सर्वत्र चिखल झाला आहे. या खड्ड्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा फोर्स इतका आहे की येथून तिन्ही बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर या दुषित पाण्याचे पाट वाहत होते. त्यामुळे या तिन्ही रस्त्यांवरही चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.

याचा मोठा मनस्ताप या रस्त्यांवर येणारा-जाणाऱ्या वाहतूकधारकांना आणि पादचाऱ्यांना सोसावा लागला. चिखलामुळे येथून सर्व वाहने सावकाश जात होती. शिवाय पादचाऱ्यांना चिखल आणि दुषित पाणी यातून रस्ता शोधून वाट काढावी लागत होती.

Panaji Smart City Work
Minor Girl Pregnancy Case : अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ !

काही दिवसांपुर्वीच सांतिनेज येथील याच रस्त्यावर काम सुरू असताना एक रस्ता खचून मातीवाहू ट्रक रुतला होता.

निकृष्ट कामांमुळे असे प्रकार होत आहेत. पणजीवासीय सततच्या खोदकामांतून होणाऱ्या धुळीमुळे वाहतूक कोडींमुळे आणि रस्त्यात वाहने खचण्याच्या घटनामुळे वैतागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com