Minor Girl Pregnancy Case : अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ !

व्हीएयू’ची धक्कादायक माहिती : राज्यात लैंगिक बलात्कारांच्या प्रकरणांतही वाढ
Rape Case
Rape Case Gomantak Digital Team

Minor Girl Pregnancy Case : राज्यात लहान मुलींच्या गर्भधारणेच्या प्रमाणात वाढ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूर्वी दर सहा महिन्यांमध्ये अशी एक किंवा दोन प्रकरणे समोर येत होती. आता मात्र या प्रमाणात दर महिन्याला दोन प्रकरणे इतकी वाढ दिसून येत आहे, अशी माहिती व्हिक्टिम असिस्टन्स युनिटचे (व्हीएयू) प्रभारी एमिडियो पिन्हो यांच्या हवाल्याने माध्यमांनी दिली.

‘व्हीएयू’कडे दर महिन्याला बाल गर्भधारणेची सरासरी दोन प्रकरणे समोर आली आहेत. सहा महिन्यांपूर्वी अशी प्रकरणांची संख्या दर सहा महिन्यांना एक किंवा दोन अशी असायची. बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतही वाढ झालेली ‘व्हीएयू’ला आढळून आले असून यात बहुतांश वेळा घरातीलच पुरूषांचा मोठा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.

Rape Case
HBD Rashmika Mandanna: फक्त 27 वर्षांची रश्मिका कमावते इतके पैसे...एवढ्या लहान वयात इतकी संपत्ती?

विशेष म्हणजे, बाल गर्भधारणांच्या प्रकरणांत पालक, शिक्षकांना काहीही कल्पना नसल्याचे दिसते. काही मुलींना मासिक पाळी आलेली नव्हती, तरीदेखील त्यांच्या मातांना याबाबत कल्पना आली नाही. नऊ महिन्यानंतर पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुलींना डॉक्टरांकडे नेल्यावर गर्भधारणा झाल्याचे अनेक प्रकरणांत समोर आले आहे.

त्यानंतर मग अशा प्रकरणांत गुन्हा नोंदवला जातो आणि पीडितेला समुपदेशनासाठी व्हीएयूमध्ये आणले जाते.

Rape Case
Hanuman Jayanti: हनुमानाच्या डोक्यावर नाही तर पायावर करा तेल अर्पण

परिचित व्यक्तींकडूनच अत्याचार

या गर्भधारणा प्रकरणातील संशयित 30ते 40 या वयोगटातील आहेत आणि 95% प्रकरणांमध्ये कुटुंबातीलच पुरूषांकडून किंवा शेजारी, कौटुंबिक मित्र, ओळखीतील व्यक्ती, भावंडाचे मित्र यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रकरणांत भाडेकरूदेखील यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे.

Rape Case
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत इंधन दरांत घट, दक्षिण गोव्यात मात्र वाढ; जाणून घ्या आजचे दर...

लैंगिक शिक्षणाचा प्रस्ताव

या समस्येवर ‘व्हीएयू’ने सहावीपासून लैंगिक शिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच विषारी नातेसंबंध आणि निरोगी संबंध काय आहेत हे मुला-मुलींना शिकवले पाहिजे, पालकांनी मुलांशी भावनिक बंध निर्माण करावा, असे सुचविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com